नावगेतील दगडफेकप्रकरणी सहा जण ताब्यात
बेळगाव : नावगे (ता. बेळगाव) येथे प्रेमाच्या त्रिकोणातून घरांवर हल्ला केल्याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सोमवार दि. 1 जानेवारी रोजी रात्री नावगे व बहाद्दरवाडी येथील तरुणांच्या भांडणातून नावगे येथील चार घरांवर तुफान दगडफेक करण्यात आली आहे. दगडफेकीत कार, दुचाकी, टीव्ही व इतर गृहोपयोगी वस्तूंसह काही घरांच्या खिडक्यांची मोडतोड केली आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. साहाय्यक पोलीस उपायुक्त एस. व्ही. गिरीश, पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास हाती घेतला असून दगडफेक प्रकरणी सहा संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती मिळाली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नावगे व बहाद्दरवाडी या दोन्ही गावात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्वत: या दोन्ही गावांना भेट देऊन महिलांना धीर दिला होता. या घटनेचे खरे कारण शोधण्याचे काम सुरू आहे, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
Home महत्वाची बातमी नावगेतील दगडफेकप्रकरणी सहा जण ताब्यात
नावगेतील दगडफेकप्रकरणी सहा जण ताब्यात
बेळगाव : नावगे (ता. बेळगाव) येथे प्रेमाच्या त्रिकोणातून घरांवर हल्ला केल्याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सोमवार दि. 1 जानेवारी रोजी रात्री नावगे व बहाद्दरवाडी येथील तरुणांच्या भांडणातून नावगे येथील चार घरांवर तुफान दगडफेक करण्यात […]
