राज्यसभेत सहा नवीन खासदारांनी घेतली शपथ
नवी दिल्ली : संसद अधिवेशनादरम्यान राज्यसभेचे सत्र गुरुवारपासून सुरू झाले. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची राज्यसभेतील नेतेपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आपला कार्यभार स्वीकारला. तसेच राज्यसभेतील सत्राच्या पहिल्याच दिवशी बिहार, झारखंड आणि मध्यप्रदेशातील सहा नवीन खासदारांनी शपथ घेतली. राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी नवीन सदस्यांचे स्वागत केले. बिहारमधील काँग्रेसचे खासदार अखिलेश प्रसाद सिंह, झारखंडमधील जेएमएमचे खासदार सरफराज अहमद आणि भाजपचे प्रदीप कुमार वर्मा यांनी शपथ घेतली. भाजप नेते बनशालाल गुर्जर, माया नरोलिया आणि बालयोगी उमेशनाथ यांनीही वरिष्ठ सभागृहाचे सदस्य म्हणून शपथ घेतली. भाजप आणि काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी हिंदीतून शपथ घेतली. दरम्यान, काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी 18 व्या लोकसभेच्या सदस्यपदाची शपथ घेतली. ते तिऊअनंतपुरममधून निवडून आले आहेत. गुरुवारी त्यांनी संविधानाची प्रत घेऊन इंग्रजीतून शपथ घेताना ‘जय हिंद, जय संविधान’ असा समारोप केला.
Home महत्वाची बातमी राज्यसभेत सहा नवीन खासदारांनी घेतली शपथ
राज्यसभेत सहा नवीन खासदारांनी घेतली शपथ
नवी दिल्ली : संसद अधिवेशनादरम्यान राज्यसभेचे सत्र गुरुवारपासून सुरू झाले. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची राज्यसभेतील नेतेपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आपला कार्यभार स्वीकारला. तसेच राज्यसभेतील सत्राच्या पहिल्याच दिवशी बिहार, झारखंड आणि मध्यप्रदेशातील सहा नवीन खासदारांनी शपथ घेतली. राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी नवीन सदस्यांचे स्वागत केले. बिहारमधील काँग्रेसचे खासदार अखिलेश प्रसाद सिंह, […]