पिरनवाडीत गृहनिर्माण प्रकल्पासाठी बुडाच्या हालचाली

अर्थसंकल्पात मंजुरी : 70 कोटीचा अंदाज अहवाल तयार बेळगाव : बुडाने आता पिरनवाडी येथील भूसंपादनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात पिरनवाडी येथील 70 एकर जमिनीत नवीन गृहनिर्माण वसाहती तयार करण्याची घोषणा केली आहे. यासाठी 70 कोटी रुपयांचा अंदाज अहवाल तयार करण्यात आला आहे. मागील 15 वर्षांपासून बुडाला नवीन विकासकामे राबविणे अशक्य झाले आहे. […]

पिरनवाडीत गृहनिर्माण प्रकल्पासाठी बुडाच्या हालचाली

अर्थसंकल्पात मंजुरी : 70 कोटीचा अंदाज अहवाल तयार
बेळगाव : बुडाने आता पिरनवाडी येथील भूसंपादनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात पिरनवाडी येथील 70 एकर जमिनीत नवीन गृहनिर्माण वसाहती तयार करण्याची घोषणा केली आहे. यासाठी 70 कोटी रुपयांचा अंदाज अहवाल तयार करण्यात आला आहे. मागील 15 वर्षांपासून बुडाला नवीन विकासकामे राबविणे अशक्य झाले आहे. भूसंपादनाचा मुद्दा आणि इतर न्यायालयीन प्रकरणांमुळे विकासकाम रखडले आहे. त्यामुळे इतर खासगी लोकांकडून जमिनी खरेदी केल्या जात आहेत. मात्र भूखंडांची खरेदी योग्यप्रकारे होत नसल्याचेही पुढे येत आहे. त्यामुळे जमीन खरेदी करणाऱ्यांना फटका बसू लागला आहे. पिरनवाडी येथील 70 एकर जमिनीचे भूसंपादन करून गृहनिर्माण वसाहत तयार केली जाणार आहे. अर्थसंकल्पात पिरनवाडी येथील नवीन प्रकल्पाबाबत नियोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी व्यावसायिक दुकाने, तलाव आणि उद्यानांचा विकास केला जाणार आहे.
व्यावसायिक दुकाने, तलाव, उद्यानांचा विकास होणार
बेळगाव अर्बन डेव्हल्पमेंट अॅथॉरिटीने विकसित केलेल्या आणि विविध भागांत असलेल्या भूखंडांचे संवर्धन केले जाणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी नवीन वसाहत निर्माण करून उत्पन्नात वाढ केली जाणार आहे. नवीन व्यावसायिक दुकाने, तलाव आणि उद्यानांचा विकास साधला जाणार आहे.
शकिल अहम्मद-बुडा आयुक्त