लक्ष्य सेन कडून सिंगापूरच्या शटलरचा पराभव
Syed Modi International: पॅरिस ऑलिम्पिकच्या निराशेनंतर लक्ष्य सेनने जोरदार पुनरागमन करत सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत शानदार विजयाची नोंद केली.
रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात 23 वर्षीय खेळाडूने सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेहचा 31 मिनिटे रंगलेल्या लढतीत 21-6, 21-7 असा पराभव केला.
सुरुवातीच्या सामन्यांप्रमाणेच पुरुष एकेरीतही लक्ष्य सेनने अंतिम फेरीत वर्चस्व गाजवले आणि सय्यद मोदी बॅडमिंटनचे विजेतेपद प्रथमच जिंकले. लक्ष्यने आपल्या दमदार कामगिरीने सामना पूर्णपणे एकतर्फी केला. दुसरीकडे, सिंगापूरचा चौथा मानांकित खेळाडू जिया हेंग जेसन तेह फॉर्मात नव्हता. लक्ष्यने हा सामना 21-7, 21-7 असा जिंकून पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले.
Edited By – Priya Dixit