युनियन जिमखाना संघाकडे सिंधुदुर्ग चषक
बेळगाव : सिंधुदुर्ग येथील समर्थ क्रिकेट अकादमी सावंतवाडी आयोजित सिंधुदुर्ग चषक बारा वर्षाखालील मुलांच्या आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत बेळगावच्या युनियन जिमखाना संघाने कोल्हापूरच्या विंग्स स्पोर्ट्स अकादमी संघाचा दोन गडी गड्यांनी पराभव करून विजेतेपद पटकावले. फरहान शेखला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. सदर स्पर्धा वेंगुर्ला येथील शासकीय मैदानावर विंग्स स्पोर्ट्स अकादमी कोल्हापूर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 8 बाद 115 धावा केल्या. त्यात यशवर्धन कुंदलने 20, संस्कार सोनेने 16, कोमल देसाई 13 धावा केल्या. युनियन जिमखाना संघातर्फे फरहान शेख 3, मोहम्मद अब्बास व कौस्तुभ पाटील यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तराखल खेळताना युनियन जिमखाना संघाने 24.4 षटकात 8 ग डीबाद 116 धावा जमवत ही अटीतटीची लढत जिंकत स्पर्धेवर आपले नाव कोरले. चारू धारवाडकरने 5 चौकारांसह 32, फरहान शेखनी 6 चौकारांसह नाबाद 32 धावा केल्या. कोल्हापूर संघातर्फे कोमल देसाई 3 तर समृद्धी जाधवने 2 गडीबाद केले. फरहान शेख सामनावीर ठरला विजेतेपट पटकावलेल्या युनियन जिमखाना संघात कर्णधार मोहम्मद हमजा, शाहरुख धारवाडकर, साईराज पोरवाल, विश्रुत कुंदरनाड, फरहान शेख, मोहम्मद अब्बास, सुहास हिरेकोडी, कौस्तुभ पाटील, स्वराज हुलजी, सलमान धारवाडकर, निखिल राठोड यांचा समावेश होता. विजयी संघाला प्रशिक्षक मिलिंद चव्हाण यांचे मार्गदर्शन तर युनियन जिमखाना अध्यक्ष चंद्रकांत बांडगी, सचिव प्रसन्न सुंठणकर यांचे प्रोत्साहन लाभले.
Home महत्वाची बातमी युनियन जिमखाना संघाकडे सिंधुदुर्ग चषक
युनियन जिमखाना संघाकडे सिंधुदुर्ग चषक
बेळगाव : सिंधुदुर्ग येथील समर्थ क्रिकेट अकादमी सावंतवाडी आयोजित सिंधुदुर्ग चषक बारा वर्षाखालील मुलांच्या आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत बेळगावच्या युनियन जिमखाना संघाने कोल्हापूरच्या विंग्स स्पोर्ट्स अकादमी संघाचा दोन गडी गड्यांनी पराभव करून विजेतेपद पटकावले. फरहान शेखला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. सदर स्पर्धा वेंगुर्ला येथील शासकीय मैदानावर विंग्स स्पोर्ट्स अकादमी कोल्हापूर संघाने नाणेफेक जिंकून […]
