सिंधू उपांत्यपूर्व फेरीत, श्रीकांत पराभूत

पॅरीस : येथे सुरू असलेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या फ्रेंच खुल्या सुपर 750 दर्जाच्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधूने महिला एकेरीमध्ये उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविताना अमेरिकेच्या झेंकचा पराभव केला. मात्र, पुरुष एकेरीत भारताच्या किदांबी श्रीकांतला चीनच्या गुआँग झूकडून हार पत्करावी लागली. गुरुवारी खेळविण्यात आलेल्या महिला एकेरी सामन्यात पी. व्ही. सिंधूने अमेरिकेच्या […]

सिंधू उपांत्यपूर्व फेरीत, श्रीकांत पराभूत

पॅरीस : येथे सुरू असलेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या फ्रेंच खुल्या सुपर 750 दर्जाच्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधूने महिला एकेरीमध्ये उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविताना अमेरिकेच्या झेंकचा पराभव केला. मात्र, पुरुष एकेरीत भारताच्या किदांबी श्रीकांतला चीनच्या गुआँग झूकडून हार पत्करावी लागली. गुरुवारी खेळविण्यात आलेल्या महिला एकेरी सामन्यात पी. व्ही. सिंधूने अमेरिकेच्या दहाव्या मानांकित बिवेन झेंगचा 13-21, 21-10, 21-14 अशा गेम्समध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. सिंधूने यापूर्वी दोनवेळा ऑलिम्पिक स्पर्धेत पदके मिळवली होती. अलीकडच्या कालावधीत वारंवार गुडघा दूखापतीमुळे सिंधूला महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये सहभागी होता आले नाही. या दुखापतीतून पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतर सिंधूची विश्व बॅडमिंटन टूरवरील पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. अकराव्या मानांकित सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना ऑलिम्पिक चॅम्पियन तसेच द्वितीय मानांकित चीनची चेन फेई किंवा डेन्मार्कच्या लिने ख्रिस्टोफर्सन बरोबर होईल.