सिंधू दुसऱ्या फेरीत, प्रणॉय, श्रीकांत पराभूत

बर्मिंगहॅम भारताच्या पीव्ही सिंधूने येथे सुरू असलेल्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये दुसऱ्या फेरीत प्रवेश केला तर पुरुष एकेरीत एचएस प्रणॉय व किदाम्बी श्रीकांत यांचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. जागतिक क्रमवारीत अकराव्या स्थानावर असणाऱ्या सिंधूने जर्मनीच्या 26 व्या मानांकित वायव्होन ली विरुद्ध पहिला गेम 21-10 असा जिंकला होता, पण यानंतर ली हिने निवृत्त होण्याचा निर्णय […]

सिंधू दुसऱ्या फेरीत, प्रणॉय, श्रीकांत पराभूत

बर्मिंगहॅम
भारताच्या पीव्ही सिंधूने येथे सुरू असलेल्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये दुसऱ्या फेरीत प्रवेश केला तर पुरुष एकेरीत एचएस प्रणॉय व किदाम्बी श्रीकांत यांचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले.
जागतिक क्रमवारीत अकराव्या स्थानावर असणाऱ्या सिंधूने जर्मनीच्या 26 व्या मानांकित वायव्होन ली विरुद्ध पहिला गेम 21-10 असा जिंकला होता, पण यानंतर ली हिने निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्याने सिंधूला दुसऱ्या फेरीत स्थान मिळाले. 28 वर्षीय सिंधूची पुढील लढत अग्रमानांकित कोरियाच्या अॅन से यंगशी होण्याची शक्यता आहे. यंग ही सिंधूसाठी कायम अडथळा ठरली असून आतापर्यंत झालेल्या सहाही लढतीत यंगने सिंधूवर मात केलेली आहे. गेल्या वर्षी दुबईमध्ये आशिया चॅम्पियनशिपमध्ये गाठ पडली त्यावेळी सिंधूने तिच्याविरुद्ध एक गेम जिंकला होता. यंग सध्या गुडघ्याच्या दुखापतीतून सावरत असून गेल्या आठवड्यात तिने प्रेंच ओपन स्पर्धा जिंकली. या मोसमातील तिचे हे दुसरे जेतेपद होते.
पुरुष एकेरीत जागतिक आठवा मानांकित एचएस प्रणॉय पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याला पहिला गेम जिंकूनही आघाडी राखता आली नाही आणि चिनी तैपेईच्या सु लि यांगकडून तो 21-14, 13-21, 13-21 असे पराभूत झाला. लि यांग हा 32 वा मानांकित आहे. याआधी प्रेंच ओपन स्पर्धेतही प्रणॉय पहिल्याच फेरीत पराभूत झाला होता. के. श्रीकांतलाही पहिल्या फेरीतच स्पर्धेबाहेर पडावे लागले. त्याला अग्रमानांकित व्हिक्टर अॅक्सेलसेनकडून 9-21, 9-21 असा पराभव पत्करावा लागला. प्रियांशू राजावत व लक्ष्य सेन हे दोनच भारतीय पुरुष एकेरीत उरले आहेत. महिलांमध्ये आकर्षी कश्यपही चिनी तैपेईच्या पाय यु पो हिच्याकडून 16-21, 11-21 असे पराभूत झाली.