लोकमान्य सोसायटीतर्फे बांद्यात सिद्धी भिडे हिचा सन्मान

”नीट” परीक्षेतील यशाबद्दल गौरव प्रतिनिधी बांदा लोकमान्य मल्टीपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटी शाखा बांदा तर्फे कु सिद्धी भिडे हिचा नीट २०२४ परीक्षेतील उल्लेखनीय यशाबद्दल गुणगौरव करण्यात आला. खेमराज विद्यालय बांदा येथे 27 रोजी प्रशालेचे मुख्याधापक नंदकिशोर नाईक ह्यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमासाठी लोकमान्य संस्थेचे क्षेत्रीय व्यवस्थापक बाळासाहेब पांडव, मार्केटिंग मॅनेजर सौ.साक्षी मयेकर,मार्केटिंग असिस्टंट मयूर पिंगुळलकर व […]

लोकमान्य सोसायटीतर्फे बांद्यात सिद्धी भिडे हिचा सन्मान

”नीट” परीक्षेतील यशाबद्दल गौरव
प्रतिनिधी
बांदा
लोकमान्य मल्टीपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटी शाखा बांदा तर्फे कु सिद्धी भिडे हिचा नीट २०२४ परीक्षेतील उल्लेखनीय यशाबद्दल गुणगौरव करण्यात आला. खेमराज विद्यालय बांदा येथे 27 रोजी प्रशालेचे मुख्याधापक नंदकिशोर नाईक ह्यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमासाठी लोकमान्य संस्थेचे क्षेत्रीय व्यवस्थापक बाळासाहेब पांडव, मार्केटिंग मॅनेजर सौ.साक्षी मयेकर,मार्केटिंग असिस्टंट मयूर पिंगुळलकर व बांदा शाखाधिकारी सौ . पल्लवी खानविलकर उपस्थित होते.‌कु.सिद्धी हिने कर्क रोगासारख्या दुर्धर आजारावर मात करत नीट २०२४ ही परीक्षा विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झाली. कु.सिद्धी हिब उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना नीट परीक्षेेची तयारी करतानाचे आपले अनुभव कथन केले.त्याच वेळी स्वतः पेशाने शिक्षिका असणाऱ्या सौ केतकी भिडे म्हणजेच कु..सिद्धीची आई ह्यांनी ह्या सगळ्या प्रवासात पालक म्हणून कशा प्रकारे तिच्या सोबत राहिलो हे सांगितले.सोसायटी तर्फे सिद्धी चा शाल, श्रीफळ, मान चिन्ह व भेट वस्तू देऊन गुण गौरव करण्यात आला.खेमराज प्रशालेकडून श्री नंदकिशोर नाईक. सर व शिक्षक वर्ग आणि कर्मचारी वर्गाचे मोठे सहकार्य लाभले.