शुभम शेळके यांची जामिनावर सुटका
मुक्तता झाल्यानंतर म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
बेळगाव : भाषिक तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवून अटक करण्यात आलेले म. ए. समितीचे नेते शुभम शेळके यांची शुक्रवारी जामिनावर सुटका करण्यात आली. शुक्रवारी जामीन मिळाल्यानंतर त्यांची रात्री उशिरा हिंडलगा कारागृहातून सुटका करण्यात आली. आनंदवाडी येथील आखाड्यात नेपाळ येथील मल्ल देवा थापा याने जय महाराष्ट्र म्हटल्यानंतर एका उद्योजकाने आक्षेप घेतला होता. त्यानंतर शुभम शेळके यांनी सोशल मीडियाद्वारे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच शिनोळी येथील उद्योजकाच्या कारखान्यावर जाऊन आंदोलनही केले होते. दोन भाषिकांमध्ये तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवत माळमारुती पोलिसांनी शुभम शेळके यांच्याविरोधात कलम 110 अंतर्गत गुन्हा दाखल केला. मंगळवारी प्रारंभी त्यांना माळमारुती पोलीस स्थानकात हजर करण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय तपासणी करून त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली. मागील चार दिवसांपासून त्यांच्या जामिनासाठी अॅड. महेश बिर्जे तसेच इतर सहकारी प्रयत्नशील होते. अखेर शुक्रवारी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. रात्री उशिरा त्यांची हिंडलगा कारागृहातून जामिनावर मुक्तता करण्यात आली. अॅड. महेश बिर्जे, अॅड. एम. बी. बोंद्रे, अॅड. बाळासाहेब कागणकर, अॅड. वैभव कुट्रे यांनी काम पाहिले. हिंडलगा येथून मुक्तता झाल्यानंतर म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करून त्यांचे स्वागत केले. यावेळी भागोजी पाटील, प्रवीण रेडेकर, प्रकाश शिरोळकर, बाबू भडांगे, सचिन दळवी, मोतेश बार्देशकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी शुभम शेळके यांची जामिनावर सुटका
शुभम शेळके यांची जामिनावर सुटका
मुक्तता झाल्यानंतर म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष बेळगाव : भाषिक तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवून अटक करण्यात आलेले म. ए. समितीचे नेते शुभम शेळके यांची शुक्रवारी जामिनावर सुटका करण्यात आली. शुक्रवारी जामीन मिळाल्यानंतर त्यांची रात्री उशिरा हिंडलगा कारागृहातून सुटका करण्यात आली. आनंदवाडी येथील आखाड्यात नेपाळ येथील मल्ल देवा थापा याने जय महाराष्ट्र म्हटल्यानंतर एका उद्योजकाने […]
