शुभम शेळके यांना अटक
भाषिक तेढ निर्माण केल्याचा ठपका
बेळगाव : आनंदवाडी येथील कुस्ती आखाड्यामध्ये नेपाळच्या मल्लाने ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय महाराष्ट्र’ अशी घोषणा दिली. यावेळी एका उद्योजकाने आक्षेप घेतला होता. महाराष्ट्राबद्दल अवमानकारक वक्तव्य केले. त्यामुळे सीमाभागातील मराठी जनतेतून तसेच महाराष्ट्रातील जनतेतूनही त्या उद्योजकाबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. म. ए. समितीचे शुभम शेळके यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा निषेध नोंदविला होता. त्यानंतर दोन भाषिकांमध्ये तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी शुभम शेळके यांना मंगळवारी अटक केली. यामुळे सीमाभागातून पुन्हा एकदा तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. आनंदवाडी येथील आखाड्यातील घटनेनंतर मराठी भाषिकांतून त्या उद्योजकावर टीकास्त्र सुरू झाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी त्या उद्योजकावर टीका केली. शुभम शेळके यांनीही त्यांच्यावर कडाडून टीका करत निषेध नोंदविला होता. लोकशाहीमार्गाने त्यांनी निषेध नोंदविला असताना कन्नड संघटनांच्या काही कार्यकर्त्यांच्या दबावामुळे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचा आरोप होत आहे.
सोमवारपासूनच शुभम शेळके यांना माळमारुती पोलीस स्थानकामध्ये हजर राहण्यासाठी पोलिसांकडून फोन केले जात होते. सोमवारी कामामुळे पोलीस स्थानकाला त्यांना जाणे अशक्य झाले. मंगळवारी सकाळी शुभम शेळके माळमारुती पोलीस स्थानकात गेले. त्यावेळी त्यांना तेथेच थांबवून घेण्यात आले. यावेळी त्यांनी माझा गुन्हा काय आहे, माझ्यावर कोणी एफआयआर दाखल केले, हे सांगा असे विचारले असता साहेब येणार आहेत, असे सांगून थांबविण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, मंगळवारी न्यायालयामध्ये एका खटल्याची तारीख असून तारखेला जाणे महत्त्वाचे आहे, असे सांगत ते पोलीस स्थानकातून बाहेर पडले. त्यानंतर ते न्यायालयात हजर झाले. न्यायालयात हजर झाल्यानंतर काहीवेळाने पोलिसांनी अचानक त्यांना ताब्यात घेतले. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर त्यांना पोलीस आयुक्त कार्यालयाकडे नेण्यात आले. त्याठिकाणी मराठी भाषिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते. त्यांनी शुभम यांना कोणत्या कारणासाठी अटक केली? असे विचारले. त्यावर पोलिसांनी थातूरमातूर उत्तरे दिली. शेवटी माळमारुती पोलीस स्थानकामध्ये त्यांच्यावर कलम 110 अन्वये गुन्हा दाखल केला व अटक केली.
Home महत्वाची बातमी शुभम शेळके यांना अटक
शुभम शेळके यांना अटक
भाषिक तेढ निर्माण केल्याचा ठपका बेळगाव : आनंदवाडी येथील कुस्ती आखाड्यामध्ये नेपाळच्या मल्लाने ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय महाराष्ट्र’ अशी घोषणा दिली. यावेळी एका उद्योजकाने आक्षेप घेतला होता. महाराष्ट्राबद्दल अवमानकारक वक्तव्य केले. त्यामुळे सीमाभागातील मराठी जनतेतून तसेच महाराष्ट्रातील जनतेतूनही त्या उद्योजकाबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. म. ए. समितीचे शुभम शेळके यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून […]
