ओटवणे हायस्कूलमधून श्रद्धा चिले प्रथम
ओटवणे प्रतिनिधी
ओटवणे येथील रवळनाथ विद्यामंदिरचा शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. या परीक्षेला बसलेले सर्व १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाळेतून प्रथम क्रमांक श्रद्धा संतोष चिले ९४.६० % (५०० पैकी ४७३ गुण) द्वितीय क्रमांक प्रणाली आनंद परब ९१.६० % (५०० पैकी ४५८ गुण) कुंदन नवीन भराडी ९०% (५०० पैकी ४५० गुण) या विद्यार्थ्यांनी पटकाविला. तर विशेष श्रेणीत १३ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत ३ विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीत २ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे ओटवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष वामन कविटकर, सचिव राजाराम वर्णेकर, सर्व संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक राजेंद्र देसाई, शिक्षक कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
Home महत्वाची बातमी ओटवणे हायस्कूलमधून श्रद्धा चिले प्रथम
ओटवणे हायस्कूलमधून श्रद्धा चिले प्रथम
ओटवणे प्रतिनिधी ओटवणे येथील रवळनाथ विद्यामंदिरचा शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. या परीक्षेला बसलेले सर्व १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाळेतून प्रथम क्रमांक श्रद्धा संतोष चिले ९४.६० % (५०० पैकी ४७३ गुण) द्वितीय क्रमांक प्रणाली आनंद परब ९१.६० % (५०० पैकी ४५८ गुण) कुंदन नवीन भराडी ९०% (५०० पैकी ४५० गुण) या विद्यार्थ्यांनी […]
