धक्कादायक !लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरी कडून नवऱ्याची धुलाई

लग्नकरुन मुलगी तिच्या माहेरच्या लोकांना सोडून सासरी येते. तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात करते. नववधू आणि नवरदेव यांचे आयुष्य बदलते. नवरीची वाट सासरचे मंडळी आतुरतेने करत असतात. घरात जल्लोषाचे वातावरण असते. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरीने जे काही …

धक्कादायक !लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरी कडून नवऱ्याची धुलाई

लग्नकरुन मुलगी तिच्या माहेरच्या लोकांना सोडून सासरी येते. तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात करते. नववधू आणि नवरदेव यांचे आयुष्य बदलते. नवरीची वाट सासरचे मंडळी आतुरतेने करत असतात. घरात जल्लोषाचे वातावरण असते. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरीने जे काही केले ते धक्कादायकच आहे.

लग्नाच्या पहिल्या रात्री नवरा-नवरीच्या खोलीतून नवरदेवाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून घरातील सर्व जण खोलीकडे धावत गेले. खोलीचे दार उघडल्यावर जे काही त्यांनी बघितले ते बघून सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला. वादावरून नवरीने नवऱ्याला चांगलेच चोपून काढले. 

हे प्रकरण आहे  माधोपूरचे. माधोपूर येथे राहणाऱ्या एका तरुणाचं लग्न मंगळूरच्या खेमपूर थिथोला ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या तरुणीशी 22 नोव्हेंबर रोजी झालं.  वरात नववधूला घेऊन घरी आली. मात्र लग्नाच्या पहिल्या रात्री नववधूचे नवरदेवाशी काही कारणांवरून वादावादी झाली. आणि रागाच्या भरात येऊन नववधूने नवरदेवाला बेदम मारहाण केली. मुलाच्या ओरडण्याचा आवाज ऐकताच सासरचे मंडळी धावत गेले. नंतर हे प्रकरण शांत केलं.

नंतरसासरचे मंडळी मुलीला घेऊन तिच्या माहेरी गेले. नवरदेवाने आता पत्नीला मानसिक आजारी असल्याचं सांगत  सोबत ठेवण्यास नकार दिला आहे. दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप -प्रत्यारोप करत आहे. त्यांनी एकमेकांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

विवाहितेची विचारपूस महिला पोलिसांनी केली असून त्यांचे भांडण स्पर्श केल्याने झाल्याचे समजले. गावात या प्रकरणाची चर्चा सुरु आहे. दोन्ही पक्षाच्या लोकांची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरु आहे. 

Edited by -Priya Dixit 

Go to Source