जलतरण स्पर्धेत श्लोक, निधी, आरोही, दिशा चमकले
बेळगाव : नुकत्याच बेंगळूर येथे संपन्न झालेल्या कर्नाटक राज्य जलतरण संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या सबज्यूनिअर व ज्यूनिअर राज्य पातळी जलतरण स्पर्धेत आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटुनी उत्कृष्ट कामगिरी करून 2 सुवर्ण 7 रौप्य व 5 कांस्य अशी एकूण 14 पदके मिळविली. निधी मुचंडी ने 100 मीटर फ्रीस्टाइल मध्ये सुवर्णपदक, 50 मीटर बॅक स्ट्रोक व 100 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रौप्य पदक, 50 मीटर फ्रीस्टाइल 50 मिटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये कांस्यपदके पटकाविले. दिशा होंडीने 100 मीटर फ्रीस्टाल सुवर्ण व 50 मीटर फ्रीस्टाइल रौप्य पदक संपादन केले. आरोही चित्रगारने 50 मीटर बॅकस्ट्रोक 50 मीटर बटरफ्लाय 200 मीटर आयएममध्ये रौप्य पदक संपादन केले तर 100 मीटर बटरफ्लाय मध्ये कास्य पदक मिळविले. श्लोक जाधव याने 100 मीटर बॅकस्ट्रोक मध्ये रौप्य पदक व 50 मीटर व 200 मीटर बॅकस्ट्रोक मध्ये कांस्यपदक पटकाविले. पुढील महिन्यात भुवनेश्वर येथे होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी आरोही चित्रगार हिची कर्नाटक राज्य संघात अभिनंदनिय निवड झाली आहे. वरील सर्व जलतरणपटूना एनआयएस जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, अमित जाधव, रणजीत पाटील, सतीश धनुचे यांचे मार्गदर्शन लाभले.
Home महत्वाची बातमी जलतरण स्पर्धेत श्लोक, निधी, आरोही, दिशा चमकले
जलतरण स्पर्धेत श्लोक, निधी, आरोही, दिशा चमकले
बेळगाव : नुकत्याच बेंगळूर येथे संपन्न झालेल्या कर्नाटक राज्य जलतरण संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या सबज्यूनिअर व ज्यूनिअर राज्य पातळी जलतरण स्पर्धेत आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटुनी उत्कृष्ट कामगिरी करून 2 सुवर्ण 7 रौप्य व 5 कांस्य अशी एकूण 14 पदके मिळविली. निधी मुचंडी ने 100 मीटर फ्रीस्टाइल मध्ये सुवर्णपदक, 50 मीटर बॅक स्ट्रोक व […]