वैजनाथ मंदिरात शिवरात्रोत्सव उत्साहात
शेकडो भाविकांनी घेतले देवदर्शन : आज दुपारी महाप्रसादाचे आयोजन
वार्ताहर /कुद्रेमनी
हरहर महदेवाच्या जयजयकारात देवरवाडी येथील श्रीक्षेत्र वैजनाथ मंदिरात शिव-पार्वती देवस्थानची विधिवत पूजा-अर्चा होऊन यंदाच्या महाशिवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. शुक्रवारी दिवसभर शेकडो भाविकांनी मंदिरात देवदर्शन घेतले. शुक्रवारी रात्री 12 वाजल्यापासून मंदिरातील मुख्य गाभाऱ्यातील शिवलिंगावर बेलपत्र वाहून दुधा-तुपाचा महाभिषेक घालण्यात आला. होमहवन, धुपादी विधी पौरोहितांच्या मंत्रोच्चारात झाला. यानंतर वैजनाथ देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीच्या चेअरमन गीतांजली सुतार, सचिव शंकर भोगण, प्रा. नागेंद्र जाधव, उपसमितीचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ व भाविकांच्या उपस्थितीत महाआरतींचा कार्यक्रम झाला. पहाटे सहापर्यंत भाविकांच्या मागणीप्रमाणे देवाला अभिषेक घालण्याचा विधी झाला. मंदिरातील मुखवटाधारी शिवलिंग व पार्वती देवीच्या मूर्तीला व नंदीला फुला-माळांनी आकर्षकपणे सजविले होते. पताका बांधून विद्युत रोषणाईने मंदिर परिसराची सजावट व स्वच्छता केली होती. भाविकांना पाणी व्यवस्था, गाड्यांसाठी पार्किंग व्यवस्था, प्रसाद किंवा इतर साहित्य खरेदीसाठी दुकानांची व्यवस्था उत्तम प्रकारे ठेवण्यात आली होती. पहाटे सहा वाजल्यापासून भाविकांची देवदर्शनसाठी ये-जा सुरू होती. दिवसभर सुरळीतपणे सगळ्यांना देवदर्शन घेता यावे यासाठी ओळीने दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली होती. चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी मंदिर परिसराला भेट देऊन पोलीस व्यवस्था चांगली ठेवली होती.
शिवलिंगावर महारुद्राभिषेक
शनिवारी मध्यरात्री शिवलिंगावर महारुद्राभिषेक व यामपूजेचा मुख्य विधी झाला. यावेळी हर…हर… महादेवाच्या जयजयकाराने डोंगर परिसर दुमदुमून गेला होता. शनिवारी दुपारी 12 ते 4 या वेळेत महाप्रसाद होणार आहे. महाप्रसादासाठी स्व-ईच्छेने दानधर्म कुणा भाविकांना करायचे असल्यास करता येतो, असे सांगून मोठ्या संख्येने उपस्थित राहून भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे स्थानिक सल्लागार उपसमितीतर्फे प्रा. नागेंद्र जाधव यांनी कळविले आहे.
Home महत्वाची बातमी वैजनाथ मंदिरात शिवरात्रोत्सव उत्साहात
वैजनाथ मंदिरात शिवरात्रोत्सव उत्साहात
शेकडो भाविकांनी घेतले देवदर्शन : आज दुपारी महाप्रसादाचे आयोजन वार्ताहर /कुद्रेमनी हरहर महदेवाच्या जयजयकारात देवरवाडी येथील श्रीक्षेत्र वैजनाथ मंदिरात शिव-पार्वती देवस्थानची विधिवत पूजा-अर्चा होऊन यंदाच्या महाशिवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. शुक्रवारी दिवसभर शेकडो भाविकांनी मंदिरात देवदर्शन घेतले. शुक्रवारी रात्री 12 वाजल्यापासून मंदिरातील मुख्य गाभाऱ्यातील शिवलिंगावर बेलपत्र वाहून दुधा-तुपाचा महाभिषेक घालण्यात आला. होमहवन, धुपादी विधी पौरोहितांच्या […]
