शिवराज जाधव यांचा वाढदिवस उत्साहात

गोव्याचे मंत्री दिगंबर कामत, भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांची उपस्थिती : संतांच्या सांप्रदायिक भजन-आनंद सोहळ्याने सर्वजण भारावले  वार्ताहर/बाळेकुंद्री बेळगाव तालुक्यातील बाळेकुंद्री खुर्द येथील ख्यातनाम उद्योजक आणि तडफदार बांधकाम व्यावसायिक श्रीमंत शिवराज अनंतराव जाधव यांचा 43 वा वाढदिवस बुधवार दि. 4 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लक्ष्मीनगर येथील जाधव सरकार मैदानावर वाढदिवसाचे आयोजन करण्यात आले […]

शिवराज जाधव यांचा वाढदिवस उत्साहात

गोव्याचे मंत्री दिगंबर कामत, भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांची उपस्थिती : संतांच्या सांप्रदायिक भजन-आनंद सोहळ्याने सर्वजण भारावले 
वार्ताहर/बाळेकुंद्री
बेळगाव तालुक्यातील बाळेकुंद्री खुर्द येथील ख्यातनाम उद्योजक आणि तडफदार बांधकाम व्यावसायिक श्रीमंत शिवराज अनंतराव जाधव यांचा 43 वा वाढदिवस बुधवार दि. 4 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लक्ष्मीनगर येथील जाधव सरकार मैदानावर वाढदिवसाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त सकाळी 11 वाजता जाधव यांच्या निवासस्थानी भजन व कीर्तनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीला उपस्थित सर्व संतांचे जाधव यांच्या हस्ते आदरातिथ्य करण्यात आले. पारंपरिक पद्धतीने त्यांचे पाद्यपूजन झाले. संतांनी जाधव घराण्यातील सर्व सदस्यांना आशीर्वाद दिले. यावेळी वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मार्गदर्शक हभप एकनाथ तुळशीदास महाराज नामदास (पंढरपूर) आणि हभप रघुनाथ सदाशिव महाराज कबीर (पंढरपूर) यांची प्रमुख उपस्थिती होती.
जगद्गुरु तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज, वारकरीरत्न श्रीगुरु पुंडलिक महाराज देहूकर यांच्या सांप्रदायिक भजन-आनंद सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. यानंतर संत मंडळींच्या उपस्थितीत प्रमुख भजनाचा कार्यक्रम रंगला. टाळ-मृदंग, तबला यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाने उपस्थित सर्वजण मंत्रमुग्ध झाले. वारकऱ्यांचा तृप्त करणारा सूर आणि टाळ-मृदंगाचा आल्हाददायक निनाद यामुळे उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. देहुकर महाराजांच्या सुमधूर भजनाने सारेच अंतर्धान पावले. या सोहळ्यासाठी बाळेकुंद्रीसह बेळगाव तालुक्यातीत असंख्य वारकरी, निमंत्रित आणि नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. शिवराज जाधव यांच्या निवासस्थानी सकाळपासूनच विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते, हितचिंतक व मित्र परिवाराने प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.