समाजकार्याचा वसा घेतलेले शिवाजीराव हंगीरकर

तरुण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर : शिवाजीराव हंगीरकर एकसष्ठी सोहळा बेळगाव : सीमाप्रश्न कधी सुटतो याचा ध्यास घेतलेली व्यक्ती म्हणजे शिवाजीराव हंगीरकर होय. नेहमीच हसतमुख व्यक्तिमत्त्व असणाऱ्या शिवाजीरावांनी तितक्याच प्रामाणिकपणे व्यवसाय करून कुटुंबीयांचा आधारवड ठरले आहेत. गोरगरिबांच्या कल्याणासाठी घेतलेला समाजकार्याचा वसा हा त्यांचा उपजत गुण आहे, असे गौरवोद्गार तरुण भारतचे समूहप्रमुख व […]

समाजकार्याचा वसा घेतलेले शिवाजीराव हंगीरकर

भारत लाईव्ह न्यूज मीडियाचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर : शिवाजीराव हंगीरकर एकसष्ठी सोहळा
बेळगाव : सीमाप्रश्न कधी सुटतो याचा ध्यास घेतलेली व्यक्ती म्हणजे शिवाजीराव हंगीरकर होय. नेहमीच हसतमुख व्यक्तिमत्त्व असणाऱ्या शिवाजीरावांनी तितक्याच प्रामाणिकपणे व्यवसाय करून कुटुंबीयांचा आधारवड ठरले आहेत. गोरगरिबांच्या कल्याणासाठी घेतलेला समाजकार्याचा वसा हा त्यांचा उपजत गुण आहे, असे गौरवोद्गार भारत लाईव्ह न्यूज मीडियाचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी काढले. सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव विश्वासराव हंगीरकर यांच्या एकसष्ठी सत्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉ. कृष्णा मेणसे होते. प्रारंभी कॉ. कृष्णा मेणसे, किरण ठाकुर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवाजीराव हंगीरकर व त्यांच्या पत्नी भाग्यश्री हंगीरकर यांचा समानचिन्ह, सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी किरण ठाकुर म्हणाले, लहानपणापासूनच सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी शिवाजीराव सीमालढ्याच्या चळवळीत सहभागी झाले आहेत. त्यामुळेच हा प्रश्न कधी सुटतो याबाबत ते उत्सुक आहेत. सामाजिक क्षेत्रात वावरताना त्यांनी मिळविलेला मित्रपरिवार तितकाच मोठा आहे. केवळ व्यवसाय न करता व्यावसायाला सामाजिक कार्याची जोड देऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. याबरोबरच हंगीरकर कुटुंबीयांचा आधारस्तंभ म्हणून त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे.
सीमाप्रश्न सोडविण्याचा त्यांचा ध्यास निश्चित यशस्वी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहरू यांच्या कार्यकाळात झालेल्या चुका सुधारल्या आहेत. त्यांनी अनेक प्रश्न सोडविले आहेत. त्यामुळे सीमाप्रश्नही सुटणार हे निश्चित आहे, असे सांगत शिवाजीराव हंगीरकर यांना दीर्घायुष्य लाभो, अशा शुभेच्छा दिल्या. माजी आमदार महांतेश कवटगीमठ यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून हंगीरकर दांपत्याचा सत्कार केला व त्यांच्या समाजकार्याचे कौतुक केले. त्यांनी केलेल्या कार्याचा समाजाला कधीही विसरणार पडणार नाही, असे सांगत शुभेच्छा व्यक्त केल्या. प्रारंभी मराठा बँकेचे संचालक बाळासाहेब काकतकर यांनी प्रास्ताविक भाषणात शिवाजीराव हंगीरकर यांच्या कार्याची माहिती दिली. यावेळी अॅड. अमर यळ्ळूरकर, अथर्व हंगीरकर, प्रकाश मरगाळे, रेणू किल्लेकर, आप्पासाहेब गुरव, नेताजी जाधव, राजाराम सूर्यवंशी आदींनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. यावेळी अनुसया हंगीरकर, मालोजीराव अष्टेकर, रमाकांत कोंडुस्कर, नगरसेवक रवी साळुंखे, सरिता पाटील, शिवाजी सुंठकर, सुनील बाळेकुंद्री, लक्ष्मण होनगेकर, अडत व्यापारी नारायण खांडेकर, मोहन बेळगुंदकर, सुहास किल्लेकर, महिंद्र माने, नारायण किटवाडकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी साहित्य, कला, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, व्यावसायिक, सहकार, शिक्षण आदी क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन प्रा. मायाप्पा पाटील यांनी केले. सुहास किल्लेकर यांनी आभार मानले.
दानवृत्ती आदर्शवत…
व्यवसाय, मैत्री, समाजकार्य सांभाळत जोपासलेली दानवृत्ती सर्वांसाठी आदर्शवत आहे. नेहमीच मित्रांना जेवण देण्यात ते अग्रेसर असतात. अन्नदान करणाऱ्या व्यक्तीला कधीही कोणत्याच गोष्टीची कमतरता भासत नाही. त्यांच्या पत्नी भाग्यश्री यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांचे भाग्य उजळले आहे, असे किरण ठाकुर यांनी सांगितले.