झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा

झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा..

झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा

झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा

झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा

चंद्र जसा हा इंद्र शोभतो

पुत्र जिजाऊचा..

 

झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा

झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा

 

गाली तील लावून बाळा काजळ घाला डोळा

उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगर वाळा

राजस रूपड, डोही टोपड पाहून सुख गोपाळा

लिंब लोन उतरा गं लवकर दृष्ट लागल बाळा

कौशल्येचा राम जसा हा लाल यशोधेचा

 

झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा

झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा

जो जो रे बाळा.. जो जो रे..

जो जो रे बाळा.. जो जो रे..

 

जाग रे.. बाळा जाग रे..

ढोल नगारे घुमुद्यात रे झळुद्यात चौघडे

शिवनेरीच्या सदरेवर भगवा झेंडा फडफडे

गडागडाचे चिरे हरपले सह्याद्रीचे कडे

बाळा तुझियासाठी मावळे मर्द मराठे खडे

आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा..

 

झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा

झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा

चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा..

झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा

झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा..

 

 

************* 

ALSO READ: छत्रपती शिवाजी महाराज आरती मराठी

शिवरायांचा पाळणा

शिवाजी पहिल्या दिवशी राजदरबारी, आला जन्माला असा खेतरी ।

बाळ शिवाजी पहिल्या अवतारी, जो बाळा जो जो रे जो ।।

 

दुसर्‍या दिवशी चला मंदिरी, केली आरास नानापरी ।

न्हाऊ घालती दासी सुंदरी, जो बाळा जो जो रे जो ।।

 

तिसर्‍या दिवशी वाजवली घंटा, सार्‍या नगरीमध्ये आनंद मोठा ।

उठा बायांनो सुंठवडा वाटा, जो बाळा जो जो रे जो ।।

 

चवथ्या दिवशी केला श्रृंगार, आले तानाजी मामा शेलार ।

असा शिवाजीस शोभे सरदार, जो बाळा जो जो रे जो ।।

 

पाचव्या दिवशी पाचवी केली, धन्य अंबिका धावून आली ।

जयप्राप्ती राजाला दिली, जो बाळा जो जो रे जो ।।

 

सहाव्या दिवशी लावून लळा, कानी कुंडल मोत्यांच्या माळा ।

गंध केशरी कपाली टिळा, जो बाळा जो जो रे जो ।।

 

सातव्या दिवशी सातवी करा, जिजाऊच्या पोटी जन्मला हिरा ।

त्याच्या टोपीला मोत्यांचा तुरा, जो बाळा जो जो रे जो ।।

 

नवव्या दिवशी नवरत्न हिरा, जशा मोत्याने गुंफिल्या तारा ।

त्याच्या स्वरुपाच्या प्रकाशा सारा, जो बाळा जो जो रे जो ।।

 

दहाव्या दिवशी करून शीन, निळ्या घोड्यावर रेशमी जीन ।

फोटो काढावा वरती बसून, जो बाळा जो जो रे जो ।।

 

अकराव्या दिवशी अकरावा रंग, पाहुनी सेना बाळाला दंग ।

पाची हत्यारे राज्याच्या संगं, जो बाळा जो जो रे जो ।।

 

बाराव्या दिवशी बोलवा माळी, केली असं लावून केळी ।

नाव शिवाजी ऐका मंडळी, जो बाळा जो जो रे जो ।।

 

तेराव्या दिवशी चला मंदिरी, पाळणा बांधून रेशमी दोरी ।

गाणे गाऊनी हलवी सुंदरी, जो बाळा जो जो रे जो ।।

 

चौदाव्या दिवशी लावून ध्वजा, शहाजीराजांनी जमविल्या फौजा ।

बाळ शिवाजी दख्खनचा राजा, जो बाळा जो जो रे जो ।।

 

पंधराव्या दिवशी नौबत वाजे, बाळ अंबारी करुनी साजे ।

संगे सेनापती लष्करी फौजे, जो बाळा जो जो रे जो ।।

 

सोळव्या दिवशी सोहळा केला, रामदासासंगे विद्या बोलला ।

धन्य शिवाजीचा पाळणा गायला, जो बाळा जो जो रे जो ।।

ALSO READ: छत्रपती शिवाजी महाराज वंशावळ

– सोशल मीडिया