शिवसेना शिंदे गटाचे नेते शिक्रापूरचे माजी उपसरपंच यांचा धारदार हत्याराने निघृण खून

शिवसेना शिंदे गटाचे शिक्रापूर तालुका संघटकचे नेते व शिक्रापूरचे माजी सरपंच दत्तात्रय बंडू गिलबिले यांचा यांचा धारदार हत्याराने निघृण खून करण्यात आला. सदर घटना रविवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली आहे. त्यांच्या घराजवळ त्यांचा खून करण्यात आला.

ते घरात खुर्चीवर बसलेले असताना अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने त्यांच्या मानेवर वार करून पळ काढला. त्यांना तातडीनं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

दत्तात्रय बंडू गिलबिले यांचाहत्येची माहिती शिक्रापूर परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे शिक्रापूर परिसरात खळबळ उडाली.

या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मालमत्ता अथवा अथवा अन्य कारणावरून हा खून करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

हल्लेखोऱ्यांची नावे व संख्या निष्पन्न झाली असून पोलीस पथक त्यांच्या मागावर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींना लवकर अटक करण्याची मागणी केली जात आहे. 

Edited By – Priya Dixit

Go to Source