Municipal Elections उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली

महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांसाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाने ४० स्टार प्रचारकांची यादी आज जाहीर केली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (शिंदे गट) आपल्या ४० स्टार …

Municipal Elections उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली

महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांसाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाने ४० स्टार प्रचारकांची यादी आज जाहीर केली आहे. 

 

आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (शिंदे गट) आपल्या ४० स्टार प्रचारकांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये अनुभवी नेते, मंत्री आणि सेलिब्रिटी अशा सर्वांचा समावेश करून पक्षाने प्रचारासाठी तगडी फळी मैदानात उतरवली आहे.

 

ही यादी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली असून, त्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय व राज्य मंत्री, खासदार, आमदार आणि प्रवक्त्यांचा समावेश आहे. यात बॉलीवूड अभिनेते तथा खासदार गोविंदा यांचे नावही आहे, जे प्रचाराला स्टार पॉवर देणार आहे.

ALSO READ: सोलापूर जिल्ह्यात प्रियकराने महिलेच्या 3 वर्षाच्या मुलाची हत्या, पोलिसांनी आरोपीला अटक केली

महानगरपालिकाची ही निवडणूक १५ जानेवारी २०२६ रोजी होणार असून, निकाल १६ जानेवारीला जाहीर होतील. शिंदे गटाने विकासाच्या मुद्द्यावर प्रचार केंद्रित करणार असल्याचे सांगितले आहे. महायुतीत (भाजप-शिंदे सेना-अजित पवार गट) जागावाटपाच्या चर्चा सुरू असून, काही ठिकाणी युती तर काही ठिकाणी स्वतंत्र लढत होण्याची शक्यता आहे.

 

या यादीतील प्रमुख नावे खालीलप्रमाणे आहे

प्रमुख नेते एकनाथ शिंदे 

डॉ. श्रीकांत शिंदे 

गोविंदा 

निलेश राणे 

शहाजीबापू पाटील 

अक्षय महाराज भोसले 

महत्त्वाचे मंत्री आणि नेते

रामदास कदम, गजानन कीर्तीकर, आनंदराव अडसूळ, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई, दीपक केसरकर, दादा भुसे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, मिलिंद देवरा, संजय निरुपम, राहुल शेवाळे 

 

महिला नेत्या

डॉ. नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे, शीतल म्हात्रे 

 

तसेच या यादीत  ज्येष्ठ नेते, तरुण आमदार आणि महिला आघाडीला योग्य स्थान देण्यात आले आहे. आगामी बीएमसी (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यादीत मुंबईतील नेत्यांचा भरणा जास्त आहे. या ४० नेत्यांच्या माध्यमातून शिंदे गट राज्यभरातील महानगरपालिकांमध्ये विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे.

ALSO READ: ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पहिले विधान आले समोर; म्हणाले….

Edited By- Dhanashri Naik

ALSO READ: परिस्थिती जर हाताबाहेर गेली तर तुमच्या नियंत्रणात काहीही राहणार नाही….मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसी आणि एमपीसीबीला फटकारले

Go to Source