कंग्राळी बुद्रुक येथे शिवजयंती पारंपरिक पद्धतीने

वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखा कंग्राळी बुद्रुक, ग्रामस्थ व विविध युवक मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती गुरूवारी पारंपरिक पद्धतीने भक्तीभावाने व उत्साहात साजरी केली. यावेळी युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देऊन परिसर शिवमय झाल्याचे चित्र दिसून येत होते. प्रारंभी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखा कंग्राळी बुद्रुक कार्यकर्त्यांच्या हस्ते शिवाजी […]

कंग्राळी बुद्रुक येथे शिवजयंती पारंपरिक पद्धतीने

वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखा कंग्राळी बुद्रुक, ग्रामस्थ व विविध युवक मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती गुरूवारी पारंपरिक पद्धतीने भक्तीभावाने व उत्साहात साजरी केली. यावेळी युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देऊन परिसर शिवमय झाल्याचे चित्र दिसून येत होते. प्रारंभी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखा कंग्राळी बुद्रुक कार्यकर्त्यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आला. यावेळी हभप प्रशांत पवार यानी विधिवत मंत्रपठण केले. यावेळी पत्रकार सदानंद चव्हाण, मोहन भैरटकर यांनी शिवरायांच्या अश्वारूढ मूर्तीचे पूजन केले. ग्रा. पं. सदस्य प्रदीप पाटील, नवनाथ पुजारी यांनी पाळणा पूजन केले. यानंतर प्रेरणामंत्र म्हणण्यात आले. यावेळी मरगाईनगर महिला भजनी मंडळातर्फे शिवाजी महाराजांचा पाळणा म्हटला. निरंजन जाधव, योगेश पवार, रवि चव्हाण, ग्रा. पं. सदस्य दादासाहेब भद्दरगडे, माजी सैनिक संघटना अध्यक्ष निवृत्त जवान रामा तारिहाळकरसह शिवप्रेमी व ग्रामस्थ उपस्थित होते.
शिवशाही युवक मंडळ
शिवशाही युवक मंडळ नेताजी गल्ली व ग्रामस्थांतर्फे गुरूवारी शिवजयंती  उत्साहात साजरी केली. हभप नागेश जाधव यांनी शिवरायांच्या मूर्तीचे पूजन केले. महादेव चव्हाण यांनी श्रीफळ वाढविले. नागेश हुद्दार यांनी पाळणा पूजन केले. यावेळी सुहासिनींनी पाळणा गीत म्हटले. शिवशाही युवक मंडळाचे कार्यकर्ते, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
राजर्षी शाहू दूध डेअरी
चव्हाट गल्ली येथील राजर्षी शाहू दूध डेअरीतर्फे शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी केली. बेळगाव बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. सुधीर चव्हाण यांनी शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन, संस्थेचे चेअरमन वाय. बी. चव्हाण यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या फोटोचे पूजन केले. यावेळी प्रेरणामंत्र म्हटले. त्यानंतर सुहासिनींनी पाळणा गीत म्हटले.
शिवशक्ती युवक मंडळ
गणेश चौक येथील शिवशक्ती युवक मंडळातर्फे शिवजयंती साजरी केली. कंत्राटदार रमेश कडोलकर यांनी शिवमूर्तीचे पूजन, सुहासिनींनी पाळणा पूजन करून पाळणा गीत म्हटले. यावेळी शिवशक्ती युवक मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.