जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंती उत्साहात

बेळगाव : जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड आणि संस्कृती खाते तसेच महानगरपालिका बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये महाराजांच्या मूर्तीला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण, जिल्हाधिकारी नितेश पाटील, […]

जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंती उत्साहात

बेळगाव : जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड आणि संस्कृती खाते तसेच महानगरपालिका बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये महाराजांच्या मूर्तीला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण, जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, महानगरपालिका सदस्य, मनपा आयुक्त, कन्नड व संस्कृती खात्याच्या विद्यावती बजंत्री आदी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.