व्रज आयर्नचे समभाग 240 रुपयांवर सुचीबद्ध

कंपनी स्पंज आयर्न आणि टीएमटी बार निर्मितीमध्ये कार्यरत मुंबई : व्रज आयर्न अँड स्टील लिमिटेडचे शेअर्स बॉम्बेस्टॉक एक्सचेंज (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) वर 15.94 टक्के वाढीसह 240 रुपयांवर सुचीबद्ध झाले. या आयपीओची इश्यू किंमत 207 होती. आयपीओ 26 जून ते 28 जून या कालावधीत किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुला होता. किरकोळ श्रेणीत 58.31 पट, पात्र […]

व्रज आयर्नचे समभाग 240 रुपयांवर सुचीबद्ध

कंपनी स्पंज आयर्न आणि टीएमटी बार निर्मितीमध्ये कार्यरत
मुंबई :
व्रज आयर्न अँड स्टील लिमिटेडचे शेअर्स बॉम्बेस्टॉक एक्सचेंज (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) वर 15.94 टक्के वाढीसह 240 रुपयांवर सुचीबद्ध झाले. या आयपीओची इश्यू किंमत 207 होती. आयपीओ 26 जून ते 28 जून या कालावधीत किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुला होता.
किरकोळ श्रेणीत 58.31 पट, पात्र संस्थात्मक खरेदीदारांमध्ये 173.99 पट आणि बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदार श्रेणीमध्ये 221.66 पटी इश्यू सबस्क्राइब झाल्याची माहिती आहे. व्रज आयर्न अँड स्टील लिमिटेडचा एकूण इश्यू 171 कोटी रुपयांचा होता. यासाठी, कंपनीने 171 कोटी किमतीचे 8,260,870 नवीन शेअर्स जारी केले आहेत. हा पूर्णपणे ताजा आयपीओ आहे, ज्यामध्ये कंपनीचे विद्यमान गुंतवणूकदार आणि प्रवर्तकांनी ऑफर फॉर सेलद्वारे एकही शेअर विकलेला नाही.
किरकोळ गुंतवणूकदार जास्तीत जास्त 936 शेअर्ससाठी बोली लावू शकतात. व्रजने या समभागाची किंमत 195-207 निश्चित केली होती. किरकोळ गुंतवणूकदार किमान एक लॉट म्हणजेच 72 शेअर्ससाठी बोली लावू शकतात. आयपीओच्या 207 च्या वरच्या प्राइस बँडवर 1 लॉटसाठी अर्ज केल्यास, तुम्हाला 14,904 ची गुंतवणूक करावी लागेल. त्याच वेळी, किरकोळ गुंतवणूकदार जास्तीत जास्त 13 लॉटसाठी म्हणजेच 936 शेअर्ससाठी अर्ज करू शकतात.
यासाठी गुंतवणूकदारांना अप्पर प्राइस बँडनुसार 193,752 खर्च करावे लागतील. 35 टक्के इश्यू किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव होता. कंपनीच्या इश्यूपैकी 50 टक्के पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव होता. या व्यतिरिक्त, सुमारे 35 टक्के हिस्सा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव होता आणि उर्वरित 15 टक्के हिस्सा बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव होता.