सागरी जलतरण स्पर्धेत शरण्याचे यश
बेळगाव : गुजरात येथे श्रीराम सागरी जलतरण संघटना राष्ट्रीय सागरी जलतरण स्पर्धेत बेळगावच्या स्विमर्स व अॅक्वेरियसच्या जलतरणपटू शरण्या कुंभारने 1 सुवर्ण, 1 रौप्य पदकासह घवघवीत यश संपादन केले. गुजरात येथील पोरबंदर चौपाटीवर घेण्यात आलेल्या सागरी जलतरण स्पर्धेत बेळगावच्या स्विमर्स व अॅक्वेरियस क्लबच्या जलतरणपटू शरण्या कुंभारने 1 कि.मी. खुल्या जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक तर 5 कि.मी. सागरी जलतरण स्पर्धेत रौप्य पदक पटकावले. मान्यवरांच्या हस्ते तिला पदके व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. शरण्याला जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितीश कुडूचकर, गोवर्धन काकतीकर, इम्रान उचगावकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
Home महत्वाची बातमी सागरी जलतरण स्पर्धेत शरण्याचे यश
सागरी जलतरण स्पर्धेत शरण्याचे यश
बेळगाव : गुजरात येथे श्रीराम सागरी जलतरण संघटना राष्ट्रीय सागरी जलतरण स्पर्धेत बेळगावच्या स्विमर्स व अॅक्वेरियसच्या जलतरणपटू शरण्या कुंभारने 1 सुवर्ण, 1 रौप्य पदकासह घवघवीत यश संपादन केले. गुजरात येथील पोरबंदर चौपाटीवर घेण्यात आलेल्या सागरी जलतरण स्पर्धेत बेळगावच्या स्विमर्स व अॅक्वेरियस क्लबच्या जलतरणपटू शरण्या कुंभारने 1 कि.मी. खुल्या जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक तर 5 कि.मी. सागरी […]
