शरद पवारांची प्रकृती ढासळली, पुन्हा रुग्णालयात दाखल करणार
राज्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मार्गदर्शक शरद पवार यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडल्याची माहिती समोर आली आहे. काहीसा अशक्तपणा जाणवत असल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, लवकरच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याचे वृत्त आहेत.
ALSO READ: अजित पवारांचा मृत्यू हा एका कटाचा भाग होता’, राष्ट्रवादी-सपा आमदार रोहित पवार यांचा आरोप
अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार हे कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी बारामतीतच तळ ठोकून होते. या काळात त्यांनी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांची भेट घेत पवार कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, सततच्या धावपळीमुळे आणि मानसिक ताणामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याचे बोलले जात आहे.
ALSO READ: “झाडे तोडणे हे सैनिकांच्या बलिदानासारखे आहे,” या पंकजा मुंडे यांच्या विधानावरून सोशल मीडियावर खळबळ उडाली
प्राथमिक माहितीनुसार, शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने त्यांना अशक्तपणा जाणवत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना सलाईन देण्यात येणार आहे. अशक्तपणा वगळता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे जवळच्या सूत्रांनी सांगितले.
ALSO READ: एसटी बस प्रवास आता ‘स्मार्ट’; १ एप्रिलपासून सवलतीच्या प्रवासासाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य
यापूर्वीही छातीत संसर्ग झाल्यामुळे त्यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते 5 दिवसांनी घरी परतले होते. आता पुन्हा त्यांना अशक्तपणामुळे अस्वस्थता जाणवत असल्याने रुग्णालयात पुन्हा दाखल करण्यात येण्याचे समजले आहे.
Edited By – Priya Dixit
