शरद पवारांचे राज्यसभेच्या सभापतींना पत्र! संसदेवरील हल्ल्याच्या चौकशीची विनंती

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांना अलीकडे संसदेवर झालेल्या हल्ल्यामुळे सुरक्षेमधील त्रुटींची चौकशी करण्याची निवेदन दिले आहे. तसेच खासदारांच्या निलंबनामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. तसेच संसदीय प्रक्रिया आणि लोकशाही मुल्यांची अखंडता टिकवून ठेवण्यासाठी या प्रकरणाकडे लक्ष देण्याची मागणी केली. 13 डिसेंबर रोजी लोकसभेमध्ये काही तरूणांनी घुसखोरी करून पिवळ्या […]

शरद पवारांचे राज्यसभेच्या सभापतींना पत्र! संसदेवरील हल्ल्याच्या चौकशीची विनंती

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांना अलीकडे संसदेवर झालेल्या हल्ल्यामुळे सुरक्षेमधील त्रुटींची चौकशी करण्याची निवेदन दिले आहे. तसेच खासदारांच्या निलंबनामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. तसेच संसदीय प्रक्रिया आणि लोकशाही मुल्यांची अखंडता टिकवून ठेवण्यासाठी या प्रकरणाकडे लक्ष देण्याची मागणी केली.
13 डिसेंबर रोजी लोकसभेमध्ये काही तरूणांनी घुसखोरी करून पिवळ्या धुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यातील काहींनी गॅलरीतून सभागृहात उडी मारून काही घोषणाही दिल्या. नेमके याच दिवशी 2001 मध्ये संसदेवर हल्ला होऊन अनेक कर्मचाऱी शहिद झाले होते. हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधकांनी या घुसखोरीच्या चौकशीची मागणी करून याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. तसेच सरकारच्या या निष्काळीपणाविरोधात घोषणाबाजी केली.
या गदारोळा दरम्यान राज्यसभेचे सभापती जगदिप धनकर यांनी खासदारांनी अस्विकृत वर्तन केल्याचा दावा करून काल 78 आणि आज 49 अशा आजपर्यंत 141 खासदारांना निलंबित केलं आहे. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सभापती जगदिप धनकर यांना पत्र लिहून म्हटले आहे कि, “संसदेवरिल हल्याच्या घटनेची तीव्रता लक्षात घेता, संसद सदस्यांनी त्याबद्दल स्पष्टीकरण मागणे स्वाभाविक आहे. सरकारने या समस्येचे निराकरण कशा प्रकारे केले जात आहे याचे विवेचन करण्यासाठी पुढे यायला हवे होते. तथापि, सरकारने अशा विधानापासून दूर राहिले आहेच शिवाय त्याचे स्पष्टीकरण किंवा विवेचन मागणाऱ्या संसद सदस्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. हे खुपच निराशाजनक आहे.” असे शरद पवार म्हणाले. शेवटी बोलताना त्यांनी, “संसदीय प्रक्रिया आणि उदाहरणे आणि लोकशाही मूल्यांची अखंडता टिकवून ठेवण्याच्या हितासाठी कृपया या प्रकरणाकडे लक्ष देण्याची विनंती करतो.”असेही म्हटले आहे.

Go to Source