विधानसभा निवडणुकीपूर्वी तुतारी निवडणूक चिन्ह रद्द करण्याची शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी

विधानसभा निवडणुकीपूर्वी तुतारी निवडणूक चिन्ह रद्द करण्याची शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक या वर्षाच्या अखेरीस होणार असून आता निवडणुकीला अवघे काहीच महिने उरले आहे.निवडणुकीत बहुमत मिळवून पुन्हा सरकारमध्ये येण्यासाठी  सत्ताधारी पक्ष महायुती सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष प्रयत्न करत आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेत विधानसभेच्या निवडणुकीत तुतारी निवडणूक चिन्हाला रद्द करण्याची मागणी केली आहे. शरद पवार गटाने निवडणूक चिन्ह रद्द करण्याची मागणी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 

 

लोकसभा निवडणुकी पूर्वी शरद पवार गटाने तुतारी हे चिन्ह रद्द करण्याची मागणी केली होती मात्र निवडणूक आयोगाने त्यांची मागणी हे चिन्ह तुतारी वाजवणाऱ्या व्यक्तीचे सांगून फेटाळली. तर दुसरे चिन्ह फक्त तुतारी आहे. दोघात काहीच साम्य नाही. आता लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा हवाला देत शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीत कोणालाही तुतारी निवडणूक चिन्ह देऊ नये अशी मागणी केली आहे. 

 

शरदचंद्र पवार गटाकडून निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात राज्यातील लोकसभेच्या 10 पैकी 9 जागांचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिले आहे. तुतारी या चिन्हाला एकूण 4.1 लाख मत मिळाले आहे. त्यांचे म्हणणे आहे की मतदार तुतारी आणि तुतारी वाजवणाऱ्या व्यक्तीच्या चिन्हात फरक करू शकले नाही आणि निकालात त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला 5.38 लाख मत  मिळाले. 

 

ते म्हणाले, सातारा लोकसभा मतदारसंघात ज्या अपक्ष उमेदवाराचे निवडणूक चिन्ह तुतारी होते त्यांना 37  हजार मते मिळाली .तर भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना 5,71,134 मते मिळाली, म्हणजे भाजप उमेदवार अंदाजे 32,771 मतांच्या फरकाने विजयी झाले.

 

त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कोणत्याही अपक्ष उमेदवाराला तुतारीचे निवडणूक चिन्ह देऊ नये.  अशी मागणी करत आहे. या फेरविचार याचिकेवर निवडणूक आयोग काय निर्णय देतो,हे नंतरच समजेल. 

 

Edited by – Priya Dixit

 

Go to Source