शालिनी रजनीश राज्य सरकारच्या नव्या मुख्य सचिव

31 जुलै रोजी रजनीश गोयल होणार सेवानिवृत्त प्रतिनिधी/ बेंगळूर विकास आयुक्त आणि अप्पर मुख्य सचिव शालिनी रजनीश यांची राज्य सरकारच्या मुख्य सचिवपदी नेमणूक करण्यात आली आहे. पतीनंतर पत्नीला मुख्य सचिवपद मिळणे ही विशेष बाब आहे. विद्यमान मुख्य सचिव रजनीश गोयल यांचा कार्यकाळ 31 जुलै रोजी संपणार असून त्या दिवशी शालिनी रजनीश मुख्य सचिवपदाची सुत्रे हाती […]

शालिनी रजनीश राज्य सरकारच्या नव्या मुख्य सचिव

31 जुलै रोजी रजनीश गोयल होणार सेवानिवृत्त
प्रतिनिधी/ बेंगळूर
विकास आयुक्त आणि अप्पर मुख्य सचिव शालिनी रजनीश यांची राज्य सरकारच्या मुख्य सचिवपदी नेमणूक करण्यात आली आहे. पतीनंतर पत्नीला मुख्य सचिवपद मिळणे ही विशेष बाब आहे. विद्यमान मुख्य सचिव रजनीश गोयल यांचा कार्यकाळ 31 जुलै रोजी संपणार असून त्या दिवशी शालिनी रजनीश मुख्य सचिवपदाची सुत्रे हाती घेतील.
शुक्रवारी बेंगळूरमध्ये पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील यांनी ही माहिती दिली. रजनीश गोयल हे 31 जुलै रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे नवे मुख्य सचिव म्हणून शालिनी रजनीश यांची नेमणूक करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. त्यांनी यापूर्वी बेळगाव जिल्हाधिकारीपदाचाही कार्यभार सांभाळला होता.
महिन्यापूर्वीच रजनीश गोयल यांच्या निवृत्तीनंतर या जागी कोणाची वर्णी लागणार, याविषयी चर्चा सुरू होती. सेवाज्येष्ठतेच्या आधारावर अनुक्रमे केंद्रीय अर्थमंत्रालयाचे सचिव अजय सेठ, विकास आयुक्त शालिनी रजनीश यांची नावे चर्चेत होती. शालिनी या 1989 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. जून 2027 पर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे. राज्य सरकारचे मुख्य सचिवपद भूषविणारे गोयल हे दाम्पत्य आहे. यापूर्वी बी. के. भट्टाचार्य आणि तेरेसा भट्टाचार्य या दाम्पत्याने हे पद भूषविले होते.