‘डब्बा कार्टेल’मध्ये शालिनी पांडे
शबाना आझमीसमवेत अनेक दिग्गज कलाकार
निर्माता फरहान अख्तर पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी एक रंजक वेबसीरिज घेऊन येत असून याचे नाव ‘डब्बा कार्टेल’ आहे. खास बाब म्हणजे या सीरिजमध्ये फरहानची सावत्र आई शबाना आझमी मुख्य भूमिका साकारणार आहे.
या सीरिजचा फर्स्ट लुक टीझर सादर करण्यात आला आहे. अमली पदार्थांच्या अवैध धंद्याला देशी जुगाडासोबत महिला कशाप्रकारे फैलावत आहेत हे यात दाखविण्यात आले आहे. डब्बा कार्टेलमध्ये अमली पदार्थांच्या तस्करीसाठी खाण्याच्या डब्याचा कशाप्रकारे वापर केला जातो हे दिसून येईल. ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर ही सीरिज प्रदर्शित होणार आहे.
या सीरिजमध्ये शबाना आझमी, अंजली धवन, ज्योतिका, शालिनी देशपांडे आणि गजराज राव यासारखे अनेक कलाकार दिसून येणार आहेत. निर्मात्यांकडून अद्याप याच्या प्रदर्शनाच तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु ही सीरिज लवकरच ऑनलाइन स्ट्रीम केली जाणार असल्याचे मानले जात आहे.
Home महत्वाची बातमी ‘डब्बा कार्टेल’मध्ये शालिनी पांडे
‘डब्बा कार्टेल’मध्ये शालिनी पांडे
शबाना आझमीसमवेत अनेक दिग्गज कलाकार निर्माता फरहान अख्तर पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी एक रंजक वेबसीरिज घेऊन येत असून याचे नाव ‘डब्बा कार्टेल’ आहे. खास बाब म्हणजे या सीरिजमध्ये फरहानची सावत्र आई शबाना आझमी मुख्य भूमिका साकारणार आहे. या सीरिजचा फर्स्ट लुक टीझर सादर करण्यात आला आहे. अमली पदार्थांच्या अवैध धंद्याला देशी जुगाडासोबत महिला कशाप्रकारे […]