रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) पक्षाचा शाहू महाराजांना बिनशर्त पाठींबा

महाविकास आघाडीचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने बिनशर्त पाठींबा जाहीर केला आहे. या संबंधीची घोषणा पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा रूपाताई वायदंडे यांनी करून त्यांनी आपला लोकसभेचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. आपल्या माघारीची घोषणा त्यांनी शाहू स्मारक येथील कार्यक्रमात मधुरिमाराजे छत्रपती यांच्या उपस्थितीमध्ये केली. यावेळी व्यासपीठावरून बोलताना राजर्षी […]

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) पक्षाचा शाहू महाराजांना बिनशर्त पाठींबा

महाविकास आघाडीचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने बिनशर्त पाठींबा जाहीर केला आहे. या संबंधीची घोषणा पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा रूपाताई वायदंडे यांनी करून त्यांनी आपला लोकसभेचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. आपल्या माघारीची घोषणा त्यांनी शाहू स्मारक येथील कार्यक्रमात मधुरिमाराजे छत्रपती यांच्या उपस्थितीमध्ये केली.
यावेळी व्यासपीठावरून बोलताना राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणाणुबंध सर्व जगाला माहीती आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर चालणारा आहे. त्यामुळे हे ऋणाणूबंध अधिक बळकट होणे गरजेचं आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी यांनी लिहलेलं देशाचं संविधान संकटात असून त्याला वाचवण्यासाठी मतांची विभागणी टाळणे गरजेच आहे. या संविधान विरोधी शक्तींना रोखण्यासाठी कोल्हापूरात महाविकास आघाडी तसेच इंडिया आघाडीचे उमेदवार शाहू महाराजांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बिनशर्त पाठींबा देण्याचा निर्णय झाला असून त्यासाठी मी आपला लोकसभेचा उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचं रुपाताई वायदंडे यांनी जाहीर केलं.
त्यानंतर मधूरिमाराजे यांनी आपल्या आभारपर भाषणात राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील ऋणाणुबंध वाढण्यासाठी आणि देशाचे संविधान वाचवण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सारख्या पक्षाच्या पाठबळाची गरज आहे. पक्षाने दिलेल्या पाठबळाबद्दल मी शाहू महाराजांच्या वतीने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानते. अशी प्रतिक्रिया दिली. या वेळी पक्षाचे शहराध्यक्ष प्रताप बाबर,कैलास जोगदंड, जिल्हाध्यक्ष सरदार कांबळे, काँग्रेसचे माजी नगरसेवक तौफिक मुल्ला यांच्यासह मोठ्या संखेने पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.