शाहीर दीनानाथ साठे यांचे वयाच्या 84 वर्षी निधन

Shahir Dinanath Sathe passed away: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नात्यातील शाहीर दीनानाथ साठे -वाटेगावकर यांचे वयाच्या 84 वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. ते पुण्याच्या जिल्हा परिषदेतून उप जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांच्यामागे …

शाहीर दीनानाथ साठे यांचे वयाच्या 84 वर्षी निधन

Shahir Dinanath Sathe passed away: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नात्यातील शाहीर दीनानाथ साठे -वाटेगावकर यांचे वयाच्या 84 वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. ते पुण्याच्या जिल्हा परिषदेतून उप जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले ,चार मुली, नातवंडे  असा मोठा परिवार आहे.  

ते 1956 मध्ये साठे वाटेगावातून शिक्षणासाठी पुण्याला आले.शिक्षण घेत असताना त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. खासदार अप्पासाहेब मोरे, खासदार देवराम कांबळे,यांनी एकत्र आणून मातंग समाजाचे संघटन केले. त्यांनी शाहिरी जतन करण्यासाठी  अनेको कार्यक्रम केले. 

त्यांनी महाराष्ट्र शाहीर परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून काम केले. त्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले. त्यांच्या मृत्यूने शोककळा पसरली आहे.  

 

Edited By- Priya DIxit 

Go to Source