डिनरमध्ये बनवा शाही पनीर रेसिपी

साहित्य- 250 ग्रॅम पनीर 1 चमचा शेंगदाणे 1 चमचा खरबूज बी 1 चमचा खसखस 1 चमचा धणे पूड

डिनरमध्ये बनवा शाही पनीर रेसिपी

साहित्य-

250 ग्रॅम पनीर  

1 चमचा शेंगदाणे 

1 चमचा खरबूज बी 

1 चमचा खसखस  

1 चमचा धणे पूड 

5-6 काजू 

लाल तिखट 

चिमूटभर मिरे पूड 

1 चमचा साखर  

टोमॅटो प्युरी 

तूप  

तेल  

1 कप दूध 

ताजी साय 

1 चमचा कसुरी मेथी 

1/4 चमचा हळद 

शाही पनीर मसाला  

चवीनुसार मीठ  

2 चमचे ताजे दही 

 

कृती- 

सर्वात आधी काजू, शेंगदाणे, खसखस ​​आणि खरबूज बिया 5-7 तास भिजत ठेवाव्या. नंतर या सर्व वस्तू बारीक करून पेस्ट बनवा. आता कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरे टाकून ही पेस्ट घालावी व परतवून घ्यावी. आता त्यामध्ये आले मिरची पेस्ट घालून परतवून घ्या. नंतर टोमॅटो प्युरीमध्ये मीठ, धणेपूड, तिखट, हळद घालून परतवून घ्या.

 

तसेच आता यामध्ये दही घालावे. व क्रीम घालून परतवून घ्या. पनीर घातल्यानंतर यामध्ये गरम मसाला आणि कसुरी मेथी घालून आणखी 1 मिनिट परतून घ्या, तसेच दूध घालून एकसारखे मिक्स होऊ दयावे.  व झाकण ठेवून 3-4 मिनिटे शिजवून घ्या. आता गॅस बंद करून तूप आणि थोडे किसलेले चीज घालावे. तर चला तयार आहे आपले कांदे न वापरता शाही पनीर रेसिपी, डिनरमध्ये पराठा सॊबत सर्व्ह करू शकतात. 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

 

Edited By- Dhanashri Naik