शाहबाज शरीफ होणार पाकिस्तानचे पंतप्रधान
नवाज यांनीच मांडला प्रस्ताव : बिलावल यांचा पक्ष देणार समर्थन
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानात निवडणुकीनंतर पंतप्रधान पदासाठी नेत्याचे नाव निवडण्याच्या हालचाली सुरू आहेत. याचदरम्यान माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी स्वत:चे बंधू शाहबाज यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवडले आहे. नवाज शरीफ यांनी स्वत:चे बंधू शाहबाज यांना पंतप्रधानपदासाठी तर मुलगी मरियम यांना पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्रिपदासाठी उमेदवार घोषित केल्याची माहिती पीएमएल-एन या पक्षाच्या प्रवक्त्या मरियम औरंगजेब यांनी गुरुवारी दिली आहे.
पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी हे पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून मागे हटले ओत. पीएमएल-एनला बाहेरून पाठिंबा देणार आहोत. शाहबाज यांच्या सरकारमध्ये सामील होणार नसल्याचे भुट्टो यांनी सांगितले आहे. नवाज शरीफ यांनी पीएमएल-एनला समर्थन जाहीर करणाऱ्या पक्षांचे आभार मानले आहेत.
पाकिस्तानच्या नॅशनल असेंबलीत एकूण 336 जागा आहेत. यातील 265 जागांकरता मतदान झाले आहे. तर एका मतदारसंघातील निवडणूक टाळण्यात आली. तर एका मतदारसंघाचा निकाल रद्दबातल ठरविण्यात आला आहे. या मतदारसंघात 15 फेब्रुवारी रोजी पुन्हा मतदान होणार आहे. तर उर्वरित 70 मतदारसंघ हे राखीव आहेत.
11-12 फेब्रुवारी रोजी सलग दोन दिवस पक्षाच्या कार्यकारिणी समितीसोबत बैठक घेतली. पीएमएल-एनला राष्ट्रीय स्तरावर पाठिंबा देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. पीएमएल-एन स्वत:च्या नेत्याला पंतप्रधान करू शकतात. आम्ही या पदावरील स्वत:चा दावा मागे घेत आहोत. राष्ट्रीय सरकार स्थापन करण्यासाठी आम्हाला आवश्यक समर्थन न मिळाल्याने आम्ही हा निर्णय घेतला असल्याचा दावा पीपीपीचे अध्यक्ष बिलावल यांनी केला आहे.
नव्याने निवडणूक नको
मी आणि माझा पक्ष देशात आता नवी समस्या उभी राहू नये या मताचे आहोत. आम्ही पुन्हा निवडणूक इच्छित नाही. याचमुळे पंतप्रधानपदाचा दावा सोडण्याचा आणि सरकारमध्ये सामील न होण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु सिनेटचे अध्यक्ष आणि नॅशनल असेंबलीचा सभापती आमच्या पक्षाचा असणार आहे. पाकिस्तानला संकटातून बाहेर काढत विकासाच्या मार्गावर नेण्याची इच्छा असल्यानेच आम्ही हे पाऊल उचलले आहे. अलिकडे पार पडलेल्या निवडणुकीत गैरप्रकार घडले हे आम्हाला मान्य आहे, परंतु आम्ही याप्रकरणी चौकशीसाठी पक्षाची समिती स्थापन करणार आहोत. पाकिस्तानाला आता नव्याने निवडणूक घेण्याची गरज नाही. नवे सरकार त्वरित स्थापन व्हावे असे बिलावल यांनी म्हटले आहे.
पीएमएल-एनशी चर्चा नाही
पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ या पक्षाचे संस्थापक तसेच माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी आपला पक्ष सरकार स्थापन करण्यासाठी पीएमएल-एन, पीपीपी किंवा एमक्यूएमशी कुठलीच चर्चा करणार नसल्याचा दावा केला आहे. इम्रान खान हे सध्या तुरुंगात आहेत. इम्रान यांच्या पक्षाकडून समर्थनप्राप्त अपक्ष उमेदवार पाकिस्तानात मोठ्या संख्येत निवडून आले आहेत.
Home महत्वाची बातमी शाहबाज शरीफ होणार पाकिस्तानचे पंतप्रधान
शाहबाज शरीफ होणार पाकिस्तानचे पंतप्रधान
नवाज यांनीच मांडला प्रस्ताव : बिलावल यांचा पक्ष देणार समर्थन वृत्तसंस्था/ इस्लामाबाद पाकिस्तानात निवडणुकीनंतर पंतप्रधान पदासाठी नेत्याचे नाव निवडण्याच्या हालचाली सुरू आहेत. याचदरम्यान माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी स्वत:चे बंधू शाहबाज यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवडले आहे. नवाज शरीफ यांनी स्वत:चे बंधू शाहबाज यांना पंतप्रधानपदासाठी तर मुलगी मरियम यांना पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्रिपदासाठी उमेदवार घोषित केल्याची […]