पाकिस्तान पंतप्रधानपदी पुन्हा शाहबाज शरीफ
नवाझ शरीफ यांचे बंधू : दुसऱ्यांदा निवड
► वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
शाहबाज शरीफ यांची रविवारी दुसऱ्यांदा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड झाली. बंधू नवाझ शरीफ यांची चौथी टर्म नाकारल्यानंतर त्यांनी दुसऱ्यांदा हे पद स्विकारले. पीएमएल-एनचे अध्यक्ष शाहबाज शरीफ यांना 201 मते मिळाल्यामुळे त्यांची पाकिस्तानचे 24 वे पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे, अशी घोषणा नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष सरदार अयाज सादिक यांनी केली आहे. पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत पीटीआयचे उमेदवार उमर अयुब खान यांना 92 मते मिळाली.
आता पंतप्रधान निवडीमुळे निवडणुकांपूर्वी संसद विसर्जित होऊन काळजीवाहू सरकारने सत्ता हाती घेतल्यानंतर शाहबाज शरीफ पुन्हा आपल्या भूमिकेत परतले. तुऊंगात बंद माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थनार्थ असलेल्या उमेदवारांनी निकालाचा निषेध केला आणि त्यांच्या सुटकेची मागणी केल्याने गुऊवारी पहिली बैठक झालेल्या संसदेत मतदान कडक सुरक्षा व्यवस्थेत झाले. इम्रान खान यांना पाठिंबा असलेल्या सुन्नी इत्तेहाद कौन्सिल (एसआयसी) पक्षाने राष्ट्रीय निवडणुकीत घोटाळ्याचा आरोप केला आहे. 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानावेळी मोबाईल इंटरनेट बंद, अटक आणि हिंसाचार आदी घटनांसोबतच निवडणूक यंत्रणेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
Home महत्वाची बातमी पाकिस्तान पंतप्रधानपदी पुन्हा शाहबाज शरीफ
पाकिस्तान पंतप्रधानपदी पुन्हा शाहबाज शरीफ
नवाझ शरीफ यांचे बंधू : दुसऱ्यांदा निवड ► वृत्तसंस्था/ इस्लामाबाद शाहबाज शरीफ यांची रविवारी दुसऱ्यांदा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड झाली. बंधू नवाझ शरीफ यांची चौथी टर्म नाकारल्यानंतर त्यांनी दुसऱ्यांदा हे पद स्विकारले. पीएमएल-एनचे अध्यक्ष शाहबाज शरीफ यांना 201 मते मिळाल्यामुळे त्यांची पाकिस्तानचे 24 वे पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे, अशी घोषणा नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष सरदार अयाज […]