दिल्लीतील स्मशानभूमीत 52 वर्षीय वृद्धाने केला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

एक घृणास्पद घटना दिल्लीत घडली असून एका व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम दिल्लीतील रोहिणी येथे असलेल्या स्मशानभूमीत 52 वर्षीय व्यक्तीने तंत्र-मंत्र आणि विधींच्या नावाखाली एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर …

दिल्लीतील स्मशानभूमीत 52 वर्षीय वृद्धाने केला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

एक घृणास्पद घटना दिल्लीत घडली असून एका व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम दिल्लीतील रोहिणी येथे असलेल्या स्मशानभूमीत 52 वर्षीय व्यक्तीने तंत्र-मंत्र आणि विधींच्या नावाखाली एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

 

अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीने मुलीच्या आजारी वडिलांच्या उपचारासाठी तंत्र-मंत्र विधी करण्याच्या नावाखाली हा गुन्हा केला. तसेच पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी मोहम्मद शरीफ याने मुलीच्या वडिलांना बरे करण्यासाठी तंत्रक्रिया करण्याच्या बहाण्याने तिला कांझावाला येथील कब्रस्तानमध्ये बोलावले. तसेच पीडितेच्या तक्रारीत आरोपीने स्मशानातच तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले आहे. आरोपी पीडित मुलीच्या कुटुंबाला आधीपासूनच ओळखत असून मदत करण्याच्या बहाण्याने तो मुलीच्या घरी जात असल्याचे समोर आले आहे.

Edited By- Dhanashri Naik 

Go to Source