Kolhapur Weather | कोल्हापुरात कडाक्याची थंडी; किमान तापमान 18 अंशांवर

                                    कोल्हापूर जिल्हा गारठला…! कोल्हापूर : कोल्हापुरात थंडीचा कडाका वाढला असून, आजचे किमान तापमान सुमारे १८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे वातावरणात गारठा जाणवत आहे आणि आगामी काळातही थंडीची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे. […]

Kolhapur Weather | कोल्हापुरात कडाक्याची थंडी; किमान तापमान 18 अंशांवर

                                    कोल्हापूर जिल्हा गारठला…!
कोल्हापूर : कोल्हापुरात थंडीचा कडाका वाढला असून, आजचे किमान तापमान सुमारे १८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे वातावरणात गारठा जाणवत आहे आणि आगामी काळातही थंडीची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात आठ दिवसांपासून थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. किमान तापमान आता १८ अंशांपर्यंत खाली आले आहे. यामुळे सायंकाळी सहा वाजल्यापासूनच हुडहुडी भरविणाऱ्या थंडीचा सामना शहरवासीयांना करावा लागत आहे. ग्रामीण भागातही थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. ग्रामीण भागातील किमान तापमान शहराच्या तुलनेतघसरल्याचे चित्र आहे.
यामुळे थंडीचा जोरदार कडाका ग्रामीण भागात जाणवत आहे. पहाटे धुके आणि थंडीमुळे जिल्हा गारठून गेला आहे. थंडी असल्याने काहीजण सकाळचे फिरायला जाणे टाळत आहेत, तर काहीजण उबदार कपड्यांचा वापर करत थंडीचा आनंद घेत आहेत. सकाळी वातावरण १८ सेल्सीअस अंश इतके होते तर सायंकाळी चार वाजता २७ अंश सेल्सीअस होते. थंडीचे वातावरण असले तर उसाच्या गळीत हंगामास जोरदार सुरुवात झाली आहे. ऊसतोडणी कामगार आणि वाहतूक कामगार चंडीची पर्वा न करता ऊस कारखान्याला पाठवण्याची धावपळ सुरु आहे.