मोपा विमानतळ धावपट्टीवर वीज कोसळल्याने दोन तास सेवा खंडित
पेडणे : मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर काल बुधवारी सायंकाळी पडलेल्या जोरदार पावसासह वीज कोसळल्याने हवाई वाहतूक सुमारे दोन तास बंद ठेवावी लागली. त्यांनतर हवाई वाहतूक सुरळीत झाली. पेडणे तालुक्यात काल सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. ढगांचा गडगडाट आणि विजांचा चकमकाट सुरु होता. अनेक ठिकाणी झाडे पडल्याने मोठी नुकसानी झाली आहे. त्यातच विमानतळावर ही वीज कोसळली. माञ कुणालाही इजा किंवा फार मोठे नुकसान झालेले नाही, असे विमानतळ सूत्रांनी सांगितले. खबरदारीचा उपाय आणि निरीक्षणासाठी म्हणून दोन तास विमान सेवा बंद ठेवण्यात आली. दोन तासांनंतर मोपावरुन होणारी विमानांची उ•ाणे तसेच आगमन सेवा सुरळीत झाली.
Home महत्वाची बातमी मोपा विमानतळ धावपट्टीवर वीज कोसळल्याने दोन तास सेवा खंडित
मोपा विमानतळ धावपट्टीवर वीज कोसळल्याने दोन तास सेवा खंडित
पेडणे : मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर काल बुधवारी सायंकाळी पडलेल्या जोरदार पावसासह वीज कोसळल्याने हवाई वाहतूक सुमारे दोन तास बंद ठेवावी लागली. त्यांनतर हवाई वाहतूक सुरळीत झाली. पेडणे तालुक्यात काल सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. ढगांचा गडगडाट आणि विजांचा चकमकाट सुरु होता. अनेक ठिकाणी झाडे पडल्याने मोठी नुकसानी झाली आहे. त्यातच विमानतळावर […]
