सर्व्हर सुरू; मात्र दर निश्चितीमुळे गोंधळ

येत्या दोन दिवसांत समस्या सुटेल; महानगरपालिका अधिकाऱ्यांचा विश्वास बेळगाव : महानगरपालिकेतील घरपट्टी व इतर करवसुली सर्व्हर समस्येमुळे थांबली होती. केवळ बेळगावचीच नाही तर संपूर्ण राज्यामध्ये ही समस्या निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. गुरुवारी सर्व्हर सुरू झाले. मात्र नवीन कराचे दर ऑनलाईनद्वारे निश्चित करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे गुरुवारी कर आकारणी थांबली होती. मात्र येत्या दोन दिवसांत […]

सर्व्हर सुरू; मात्र दर निश्चितीमुळे गोंधळ

येत्या दोन दिवसांत समस्या सुटेल; महानगरपालिका अधिकाऱ्यांचा विश्वास
बेळगाव : महानगरपालिकेतील घरपट्टी व इतर करवसुली सर्व्हर समस्येमुळे थांबली होती. केवळ बेळगावचीच नाही तर संपूर्ण राज्यामध्ये ही समस्या निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. गुरुवारी सर्व्हर सुरू झाले. मात्र नवीन कराचे दर ऑनलाईनद्वारे निश्चित करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे गुरुवारी कर आकारणी थांबली होती. मात्र येत्या दोन दिवसांत हे काम पूर्णपणे सुरळीत होईल, असे महानगरपालिकेतील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होते. त्यामुळे शहरात ठरविण्यात आलेल्या जमिनीच्या दरानुसार करामध्ये वाढ केली जाते. दरवर्षी पाच ते दहा टक्के वाढ करण्यात येते. यावर्षीही वाढ होणार आहे. नगरविकास खात्याच्या मार्गसुचीनुसार ही दरवाढ केली जाते. शहराच्या विविध भागातील दराची निश्चिती नोंदणी कार्यालयाकडून केली जाते. ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता नवीन निश्चित केलेल्या दरानुसारच महानगरपालिकेचाही कर वाढविला जातो. सर्वसाधारण 5 ते 10 टक्के यामध्ये वाढ होत असते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान गेल्या चार दिवसांपासून सर्व्हर समस्या, तसेच दर निश्चितीमुळे कर जमा करण्याची प्रक्रिया थांबली आहे. यातच लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी या कर्मचाऱ्यांना जुंपण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या इतर कामांवर त्याचा परिणाम झाला आहे. तरीदेखील येत्या दोन दिवसांमध्ये निश्चितच कर आकारणीसाठी अधिकारी काम करतील. याचबरोबर जनतेलाही ऑनलाईनद्वारे आपला कर भरता येणार आहे, असे सांगण्यात आले.