लातूर भीषण अपघात: औसा-तुळजापूर महामार्गावर BMW कार आणि टेम्पोचा भीषण अपघात
औसा-तुळजापूर महामार्गावर झालेला हा भीषण अपघात अत्यंत दुर्दैवी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार औसा-तुळजापूर महामार्गावरील बेलकुंड पाटी जवळ हा अपघात घडला. भरधाव वेगाने येणारी BMW कार (MH-12 पासिंग) आणि तुळजापूरकडून लातूरच्या दिशेने जाणारा आयशर टेम्पो यांच्यात ही समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की BMW कारचा पुढचा भाग पूर्णपणे चिरडला गेला असून, कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात फेकली गेली. टेम्पोचेही मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात आतापर्यंत ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
टेम्पो चालक आणि कारमधील अन्य १ प्रवासी गंभीर जखमी आहे. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
ALSO READ: रेल्वे स्थानकावर मोठा अपघात; फोन हिसकावून पाळणाऱ्या व्यक्तीचा पाठलाग करताना २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू
अपघातानंतर महामार्गावर दोन्ही बाजूंनी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. औसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला काढली आणि साधारण १० वाजेच्या सुमारास वाहतूक पूर्ववत केली.
ALSO READ: समृद्धी एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, ट्रकने चिरडून तीन कामगारांचा मृत्यू
Edited By- Dhanashri Naik
