रॉबर्ट वड्रा यांच्याकडून भावना व्यक्त

अमेठीच्या उमेदवारीसाठी होते इच्छुक : काँग्रेसकडून स्थानिक नेत्याला संधी वृत्तसंस्था/ नवी दिल्ली काँग्रेस नेत्या प्रियांका वड्रा यांचे पती रॉबर्ट वड्रा यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान एक भावुक पोस्ट केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रायबरेलीतून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर वड्रा यांनी ही पोस्ट केली आहे. या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्यांनी राजकारणाचे सामर्थ्य आणि परिवाराच्या संबंधांचा उल्लेख केला […]

रॉबर्ट वड्रा यांच्याकडून भावना व्यक्त

अमेठीच्या उमेदवारीसाठी होते इच्छुक : काँग्रेसकडून स्थानिक नेत्याला संधी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस नेत्या प्रियांका वड्रा यांचे पती रॉबर्ट वड्रा यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान एक भावुक पोस्ट केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रायबरेलीतून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर वड्रा यांनी ही पोस्ट केली आहे. या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्यांनी राजकारणाचे सामर्थ्य आणि परिवाराच्या संबंधांचा उल्लेख केला आहे. अमेठीची उमेदवारी न मिळाल्यानंतर रॉबर्ट वड्रा यांनी या पोस्टद्वारे स्वत:च्या भावना व्यक्त केल्याचे मानले जात आहे. या पोस्टमध्ये रॉबर्ट यांनी जनतेचे समर्थन आणि शुभेच्छांसाठी आभार मानले आहेत. वड्रा यांची अमेठीत पोस्टर्स झळकली होती.
राजकारणातील कुठलीही शक्ती, पद आमच्या परिवारादरम्यान येऊ शकत नाही. आम्ही सर्व आमच्या महान राष्ट्राच्या जनतेच्या कल्याणासाठी काम करू आणि करत राहू. मी सदैव जनसेवेच्या माध्यमातून लोकांना शक्य तितकी मदत करणार असल्याचे वड्रा यांनी नमूद केले आहे. यापूर्वी वड्रा यांना उमेदवारी न मिळाल्याने भाजपकडून उपरोधिक टिप्पणी करण्यात आली होती. वड्रा यांना परिवारात बाजूला  करण्यात आल्याचा दावा भाजपने केला होता.
काँग्रेसने अमेठीत किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. तर रायबरेलीत राहुल गांधी हेच उमेदवार असणार आहेत. अमेठीत परिवाराच्या सदस्याला उमेदवारी देण्याऐवजी बिगर-गांधीला तिकीट देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. तर दुसरीकडे वड्रा यांनी राजकारणात प्रवेशाचे संकेत दिले होते. देशाच्या विकासात योगदान देण्याची संधी मिळाली तर मी स्वत:ला सुदैवी समजणार असल्याचे रॉबर्ट वड्रा यांनी म्हटले होते.