आमदार रोहित पवार यांची संवेदनशीलता

हुतात्मा दिनी ट्विटद्वारे अभिवादन प्रतिनिधी/ बेळगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाच्या भेटीप्रसंगीचा संग्रहित फोटो ट्विट करून हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ देऊ नका, असे आवाहन सीमावासियांना केले आहे. पवारांची तिसरी पिढी आता सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रयत्नशील आहे. मागीलवर्षी रोहित पवार बेळगावमध्ये आले होते. […]

आमदार रोहित पवार यांची संवेदनशीलता

हुतात्मा दिनी ट्विटद्वारे अभिवादन
प्रतिनिधी/ बेळगाव
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाच्या भेटीप्रसंगीचा संग्रहित फोटो ट्विट करून हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ देऊ नका, असे आवाहन सीमावासियांना केले आहे.
पवारांची तिसरी पिढी आता सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रयत्नशील आहे. मागीलवर्षी रोहित पवार बेळगावमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाला भेट दिली होती. सीमावासियांच्या व्यथा जाणून घेतल्यामुळे सीमावासियांसोबत त्यांचा एक वेगळा ऋणानुबंध तयार झाला. त्यामुळेच महाराष्ट्रातील इतर नेत्यांना हुतात्मा दिनाचा विसर पडला तरी रोहित पवारांनी ट्विट करून अभिवादन केल्याने सीमावासियांमधून आभार मानले जात आहेत.