बाजारात अंतिम सत्रात सेन्सेक्स तेजीत

एचडीएफसी-कोटक बँकेचे समभाग उच्चांकावर वृत्तसंस्था/ मुंबई चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक वधारुन बंद झाला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी मात्र काहीसा प्रभावीत होत बंद झाल्याचे दिसून आले. यामध्ये सेन्सेक्सचा निर्देशांक 21 अंकांनी वधारुन बंद झाला आहे. यामध्ये बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 20.59 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 74,248.22 वर बंद झाला आहे. दुसऱ्या […]

बाजारात अंतिम सत्रात सेन्सेक्स तेजीत

एचडीएफसी-कोटक बँकेचे समभाग उच्चांकावर
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक वधारुन बंद झाला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी मात्र काहीसा प्रभावीत होत बंद झाल्याचे दिसून आले. यामध्ये सेन्सेक्सचा निर्देशांक 21 अंकांनी वधारुन बंद झाला आहे.
यामध्ये बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 20.59 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 74,248.22 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला मात्र राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 0.95 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 22,513.70 वर बंद झाला आहे. सेन्सेक्समध्ये 13 समभागांमध्ये तेजीची नोंद केली आहे. तर 17 समभाग हे घसरणीसह बंद झाले आहेत. निफ्टीमधील स्थिती पाहिल्यास यामध्ये 50 मधील 20 समभाग हे वधारले आहेत. भारतीय बाजारात दिवसभर चढउताराचे सत्र राहिले होते. सेन्सेक्समध्ये काहीशी घसरण राहिली होती मात्र नंतर त्यामध्ये रिकव्हरी झाल्याचे दिसून आले.
पतधोरण बैठकीचा दिलासा
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून मागील दोन दिवसांपासून सुरु असणाऱ्या पतधोरण बैठकीमधील निर्णय शुक्रवारी जाहीर करण्यात आला. रेपो दरात बदल न केल्याच्या निर्णयामुळे बाजाराला काहीसा दिलासा मिळत गेल्याने बाजारातील घसरणीला ब्रेक लागत रिकव्हरीची स्थिती राहिली होती. आरबीआयने रेपोदर स्थिर राहणार असल्याची घोषणा केली आहे. या कारणामुळे बँकिंग आणि फायनान्शिअल सर्व्हिस देणाऱ्या समभागांमध्ये सकारात्मक तेजीचा कल राहिला होता. शुक्रवारच्या सत्रात तेजीत राहिलेल्या कंपन्यांमध्ये प्रामुख्याने कोटक बँक, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, एचडीएफसी लाईफ, आयटीसी आणि श्रीराम फायनान्स यांचे समभाग वधारले आहेत. तर घसरणीत राहिलेल्या कंपन्यांमध्ये ग्रासिम इंडस्ट्रीज, अल्ट्राटेक सिमेंट, लार्सन अॅण्ड टुब्रो, बजाज ऑटो, भारती एअरटेल, हिंडाल्को आणि बजाज फायनान्स यांचे समभाग प्रभावीत राहिले आहेत. भारती हेक्साकॉम लिमिटेडच्या आयपीओचा 5 एप्रिल हा शेवटचा दिवस होता.