सेन्सेक्स तब्बल 1,000 अंकांनी घसरणीत

आशियातील बाजार तेजीत : निफ्टीही 333 अंकांनी नुकसानीत वृत्तसंस्था/ मुंबई चालू सप्ताहातील पहिल्या दिवशी भारतीय भांडवली बाजार अयोध्येतील राममंदिर प्रतिष्ठापनेनिमित्त बंद राहिला होता. मात्र नेहमीप्रमाणे मंगळवारपासून बाजार सुरु राहिला. यावेळी पहिल्याच दिवशी सेन्सेक्स सकाळी तेजीसह सुरु झाला. मात्र ही तेजी कायम टिकवण्यात अपयश आले व सेन्सेक्सने तब्बल 1,000 अंकांची घसरण नोंदवली आहे. एचडीएफसी बँकेचे समभाग […]

सेन्सेक्स तब्बल 1,000 अंकांनी घसरणीत

आशियातील बाजार तेजीत : निफ्टीही 333 अंकांनी नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू सप्ताहातील पहिल्या दिवशी भारतीय भांडवली बाजार अयोध्येतील राममंदिर प्रतिष्ठापनेनिमित्त बंद राहिला होता. मात्र नेहमीप्रमाणे मंगळवारपासून बाजार सुरु राहिला. यावेळी पहिल्याच दिवशी सेन्सेक्स सकाळी तेजीसह सुरु झाला. मात्र ही तेजी कायम टिकवण्यात अपयश आले व सेन्सेक्सने तब्बल 1,000 अंकांची घसरण नोंदवली आहे.
एचडीएफसी बँकेचे समभाग हे सलगच्या घसरणीत राहिले. तसेच आर्थिक समभागांमध्ये घसरणीची नेंद केली आहे. तर सोनीकडून करण्यात येणार व्यवहार रद्द करण्यात आल्यानंतर झी एटरटेन्मेंटचे समभाग जवळपास 30 टक्क्यांनी कोसळले. याचा परिणाम हा भारतीय बाजारात झाल्याचे दिसून आले. दिग्गज कंपन्यांमध्ये दिवसअखेर 1,053.10 अंकांच्या नुकसानीसोबत सेन्सेक्स निर्देशांक 70,370.55 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 21,238.80 वर बंद झाला आहे.
मंगळवारच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स तेजीसह खुला झाला दरम्यान 72 हजारचा टप्पा प्राप्त केल्याचे दिसून आले. परंतु ही तेजी कायम न टिकता बाजार घसरणीसह बंद झाला.
मुख्य कंपन्यांच्या कामगिरीत सनफार्माचे समभाग हे सर्वाधिक म्हणजे 3.67 टक्क्यांनी वधारले आहेत. तर भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, पॉवरग्रिड कॉर्प, टीसीएस आणि बजाज फिनसर्व्ह यांचे समभाग हे वधारुन बंद झाले. अन्य कंपन्यांमध्ये बँकिंगचे समभाग हे जोरदार आपटले आहेत. इंडसइंड बँकेचे समभाग 6.13 टक्क्यांनी नुकसानीत राहिले. स्टेट बँक, एचडीएफसी बँक,  रिलायन्सचे समभाग घसरणीत राहिले होते.