दुसऱ्या सत्रात सेन्सेक्स-निफ्टी मजबूत
एप्रिलमधील किरकोळ महागाई दराचा सकारात्मक परिणाम
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील मंगळवारी दुसऱ्या सत्रात बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक मजबूत झाल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये एप्रिलमधील किरकोळ महागाई दर 11 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर राहिला असून तो 4.83 टक्क्यांवर राहिला आहे. तसेच मुख्य कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागामध्ये खरेदीमुळे बाजाराला मजबूतता प्राप्त करता आली.
मुख्य कंपन्यांमध्ये बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 328.48 टक्क्यांनी वधारुन निर्देशांक 0.45 टक्क्यांसोबत 73,104.61 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 113.80 अंकांच्या भक्कम स्थितीसोबत 22,217.85 वर बंद झाला आहे. दरम्यान निफ्टीमधील 50 कंपन्यांमधील 36 समभाग हे वधारले तर 14 समभाग हे प्रभावीत झाले आहेत.
प्रमुख कंपन्यांमध्ये मंगळवारी सेन्सेक्समध्ये महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, लार्सन अॅण्ड टुब्रो, जेएसडब्ल्यू स्टील, एनटीपीसी, इंडसइंड बँक, सनफार्मा, अल्ट्राटेक सिमेंट, भारतीय स्टेट बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि मारुती सुझुकी यांचे समभाग हे वधारले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये नेस्ले, टाटा कंसल्टेंसी सर्व्हिसेस, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, आयटीसी आणि एशियन पेन्ट्स यांचे समभाग हे घसरणीत राहिले आहेत.
महागाईतून काहीसा दिलासा
सरकारने सोमवारी सादर केलेल्या आकडेवारीमधून घरगुती साहित्याच्या किंमतीमध्ये घसरणीच्या कारणास्तव एप्रिल महिन्यातील किरकोळ महागाई दर हा 11 महिन्यांच्या नीचांकावर असून तो 4.83 टक्क्यांवर आला आहे.
जागतिक संकेत
जगभरातील बाजारांमधील स्थिती पाहिल्यास यामध्ये मंगळवारी आशियातील बाजारात सियोल आणि टोकीओ वधारुन बंद झाला. तर शांघाय आणि हाँगकाँगचा बाजार प्रभावीत राहिला आहे. युरोपीय बाजारात मिळताजुळता कल राहिला होता.
Home महत्वाची बातमी दुसऱ्या सत्रात सेन्सेक्स-निफ्टी मजबूत
दुसऱ्या सत्रात सेन्सेक्स-निफ्टी मजबूत
एप्रिलमधील किरकोळ महागाई दराचा सकारात्मक परिणाम वृत्तसंस्था/ मुंबई भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील मंगळवारी दुसऱ्या सत्रात बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक मजबूत झाल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये एप्रिलमधील किरकोळ महागाई दर 11 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर राहिला असून तो 4.83 टक्क्यांवर राहिला आहे. तसेच मुख्य कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागामध्ये खरेदीमुळे बाजाराला मजबूतता प्राप्त करता […]