सेन्सेक्स-निफ्टीमध्ये नव्या विक्रमाची नोंद

दोन्ही निर्देशांक भक्कम स्थितीत : राजकीय स्थितीचा लाभ वृत्तसंस्था /मुंबई भारतीय भांडवली बाजार गुरुवारी चौथ्या सत्रात पुन्हा एकदा नव्या विक्रमाची नोंद करत बंद झाला आहे. आतापर्यंतच्या प्रवासामधील बाजारात सेन्सेक्स व निफ्टी यांच्या निर्देशांकांनी आपली नवी कामगिरी पार पाडली आहे. यामध्ये अर्थव्यवस्थेसंदर्भात सादर होणारे सकारात्मक आकडे, देशातील राजकीय स्थिरता आणि विदेशी गुंतवणूकदारांकडून होणारी विक्रमी समभाग विक्री […]

सेन्सेक्स-निफ्टीमध्ये नव्या विक्रमाची नोंद

दोन्ही निर्देशांक भक्कम स्थितीत : राजकीय स्थितीचा लाभ
वृत्तसंस्था /मुंबई
भारतीय भांडवली बाजार गुरुवारी चौथ्या सत्रात पुन्हा एकदा नव्या विक्रमाची नोंद करत बंद झाला आहे. आतापर्यंतच्या प्रवासामधील बाजारात सेन्सेक्स व निफ्टी यांच्या निर्देशांकांनी आपली नवी कामगिरी पार पाडली आहे. यामध्ये अर्थव्यवस्थेसंदर्भात सादर होणारे सकारात्मक आकडे, देशातील राजकीय स्थिरता आणि विदेशी गुंतवणूकदारांकडून होणारी विक्रमी समभाग विक्री यामुळे बाजारांची नव्या टप्प्यांवरील कामगिरी अधिकच स्पष्ट होत असल्याचे दिसून आले.
दरम्यान गुरुवारी बाजारात इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टीसीएस यासारख्या मोठ्या कंपन्यांच्या समभागांनी मजबूत कामगिरी केल्याने बाजार सलग चौथ्या सत्रात विक्रमी भरारी घेत बंद झाला आहे. बीएसई सेन्सेक्समध्ये दिवसअखेर 568.93 अंकांनी मजबूत होत निर्देशांकाने 0.72 टक्क्यांसोबत 79,243.18 वर नवा विक्रम प्राप्त केला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 175.70 अंकांच्या मजबुतीसोबत निर्देशांक 24,044.50 वर बंद झाला आहे.
सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये अल्ट्राटेक सिमेंटचे समभाग हे सर्वाधिक 5.07 टक्क्यांनी वधारले आहेत. ही देशातील अग्रणी सिमेंट निर्मितीमधील कंपनी असून त्यांनी चेन्नई येथील प्रतिस्पर्धी असणारी कंपनी इंडिया सिमेंट्समधील 23 टक्क्यांच्या हिस्सेदारीचे अधिग्रहण करण्यास सकारात्मकता दर्शवली आहे. या बातमीमुळे अल्ट्राटेकचे समभाग अधिक चमकले आहेत. यासह एनटीपीसी, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा मोर्ट्स, इन्फोसिस, टीसीएस, कोटक बँक, भारती एअरटेल, पॉवरग्रिड कॉर्प, टेक महिंद्राचे समभाग हे प्रामुख्याने नफा कमाईत राहिले. अन्य कंपन्यांमध्ये लार्सन अॅण्ड टुब्रोचे समभाग हे 1.11 टक्क्यांनी घसरणीत राहिले. तर सनफार्मा, नेस्ले, एचडीएफसी बँक आणि मारुती सुझुकीचे समभाग हे प्रभावीत राहिले. गुरुवारी अधिकच्या क्षेत्रांमध्ये तेजीची चमक राहिल्याचे पाहायला मिळाले. आयटी आणि एनर्जी क्षेत्रातील कंपन्या मजबूत होत्या.
समभाग वधारलेल्या कंपन्या

अल्ट्राटेक सिमेंट  11716
एलटीआय माइंट्री 5377
ग्रासिम    2637
एनटीपीसी            377
विप्रो       510
डॉ. रे•िज लॅब्ज  6235
जेएसडब्ल्यू स्टील 943
बीपीसीएल            304
टाटा मोटर्स           972
इन्फोसिस             1573
टीसीएस 3934
कोटक महिंद्रा      1830
हिंडाल्को              685
पॉवरग्रिड कॉर्प     331
टेक महिंद्रा           1432
अदानी पोर्टस्       1485
भारती एअरटेल    1475
रिलायन्स               3061
टाटा स्टील            174
अपोलो हॉस्पिटल 6192
एसबीआय लाइफ 1463
एचसीएल टेक       1454
एचडीएफसी लाइफ            593
हिरो मोटोकॉर्प     5485
आयटीसी              425
इंडसइंड बँक        1502
अॅक्सिस बँक         1288
टायटन   3380
ब्रिटानिया              5430
आयसीआयसीआय              1219
अदानी एंटरप्रायझेस           3175
बजाज फायनान्स 7166
सिप्ला     1480

समभाग घसरलेल्या कंपन्या

श्रीराम फायनान्स  2951
लार्सन टुब्रो            3564
बजाज ऑटो         9417
आयशर मोटर्स      4713
डिव्हीस लॅब्ज       4522
कोल इंडिया          467
सन फार्मा              1516
एचडीएफसी बँक 1696