दुसऱ्या सत्रात सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद
टीसीएस आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग वधारले
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू सप्ताहातील दुसऱ्या सत्रात बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक वधारुन बंद झाले. मंगळवारी शेअरबाजारात सेन्सेक्समध्ये सकारात्मक कामगिरी प्राप्त करणाऱ्या कंपन्यांमध्ये एचडीएफसी बँक, टीसीएस आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग मात्र वधारुन बंद झाले.
मुख्य कंपन्यांच्या मदतीने मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स दिवसअखेर 165.32 अंकांनी वधारुन निर्देशांक 0.22 टक्क्यांसोबत 73,667.96 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 3.05 टक्क्यांनी वधारुन निर्देशांक 22,335.70 वर स्थिरावला आहे.
भारतीय शेअरबाजारात सेन्सेक्समधील 30 समभागांमध्ये दिग्गज ऑटो क्षेत्रातील कंपनी मारुती सुझुकी, आयटी क्षेत्रातील कंपनी इन्फोसिस आणि दूरसंचार क्षेत्रात कार्यरत भारती एअरटेल यांचे समभाग हे प्रामुख्याने चांगल्या तेजीत राहिले होते. तर अन्य कंपन्यांमध्ये स्टेट बँक 2 टक्क्यांनी प्रभावीत झाले होते. यासह जेएसडब्ल्यू स्टील, आयटीसी, एनटीपीसी, टाटा मोर्ट्स आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग मात्र नुकसानीत बंद झाल्याचे पाहायला मिळाले. बाजारात विक्रीचा प्रभाव राहिल्याने अदानी समूहातील समभाग हे 2 ते 4 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले होते.
जागतिक स्थिती
जागतिक पातळीवरील घडामोडींमध्ये अमेरिकेतील महागाईच्या आकडेवारीमुळे जगभरातील शेअर बाजारांनी सावध भूमिका घेतली आहे. अमेरिकेत मात्र मिश्र कल राहिला होता. नॅसडॅक घसरणीत तर डोव्ह जोन्स तेजीत होता. तर युरोपातील बाजार तेजीत होते. आशियाई बाजारावर नजर टाकल्यास कोस्पी, हँगसेंग तेजीत होते तर निक्केई व शांघाय कंपोझीट नुकसानीत होते. आगामी काळात भारतामध्ये लोकसभेच्या पाठोपाठ विधानसभेच्याही निवडणूका होणार आहेत. यामुळे शेअर बाजारात सावधता राहणार आहे.
Home महत्वाची बातमी दुसऱ्या सत्रात सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद
दुसऱ्या सत्रात सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद
टीसीएस आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग वधारले वृत्तसंस्था/ मुंबई भारतीय भांडवली बाजारात चालू सप्ताहातील दुसऱ्या सत्रात बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक वधारुन बंद झाले. मंगळवारी शेअरबाजारात सेन्सेक्समध्ये सकारात्मक कामगिरी प्राप्त करणाऱ्या कंपन्यांमध्ये एचडीएफसी बँक, टीसीएस आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग मात्र वधारुन बंद झाले. मुख्य कंपन्यांच्या मदतीने मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स दिवसअखेर […]
