सेन्सेक्सची झेप 80,000 च्या समीप
जागतिक बाजारांमधील मजबुतीचा बाजाराला लाभ
मुंबई :
जागतिक बाजारामधील मिळणाऱ्या सकारात्मक वातावरणाचा फायदा हा भारतीय शेअर बाजाराला होत असल्याचे चित्र बुधवारच्या बाजारातील कामगिरीवरुन दिसून येत आहे. चालू आठवड्यातील तिसऱ्या सत्रात बुधवारी बँकिंग व एफएमसीजी क्षेत्रातील मजबूत खरेदीमुळे सेन्सेक्सची झेप ही तब्बल 80,000च्या समीप पोहोचत नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. तर निफ्टीच्या कामगिरीतही भरारीची स्थिती राहिली आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 545.35 अंकांनी वधारुन निर्देशांक 79,986.80 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 162.65 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 24,286.50 वर विक्रमी पातळीवर पोहोचत बंद झाला आहे.
सकारात्मक कामगिरी करणाऱ्या कंपन्यांमध्ये बुधवारी अदानी पोर्ट्स, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, इंडसइंड बँक, भारतीय स्टेट बँक, पॉवरग्रिड कॉर्प, जेएसडब्ल्यू स्टील, बजाज फायनान्स आणि टाटा स्टील यांचे समभाग हे सर्वाधिक नफा कमाईत राहिले आहेत.
अन्य कंपन्यांमध्ये आयटी क्षेत्रातील कंपनी टाटा कंसल्टेंसी सर्व्हिसेस, टायटन, दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज, ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी टाटा मोर्ट्स आणि लार्सन अॅण्ड टुब्रो यांचे समभाग मात्र नुकसानीत राहिले आहेत.
जागतिक पातळीवरील स्थिती
जागतिक बाजारात बुधवारी उत्साह पाहायला मिळाला आहे. बुधवारच्या सत्रात आशियातील बाजारांमध्ये सियोल, टोकीओ आणि हाँगकाँग हे बाजार सकारात्मक स्थितीत राहिले होते. तर शांघायचा बाजार प्रभावीत राहिला होता. युरोपीयन बाजारांमध्ये तेजीचा कल राहिला होता. यामुळे या सर्व घडामोडींचा योग्य तो फायदा भारतीय बाजाराला झाला आहे. मंगळवारच्या सत्रात अमेरिकन बाजार वधारुन बंद झाला. दरम्यान जागतिक बाजारात कच्चे तेल 0.09 टक्क्यांनी वधारुन ते 86.32 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.
Home महत्वाची बातमी सेन्सेक्सची झेप 80,000 च्या समीप
सेन्सेक्सची झेप 80,000 च्या समीप
जागतिक बाजारांमधील मजबुतीचा बाजाराला लाभ मुंबई : जागतिक बाजारामधील मिळणाऱ्या सकारात्मक वातावरणाचा फायदा हा भारतीय शेअर बाजाराला होत असल्याचे चित्र बुधवारच्या बाजारातील कामगिरीवरुन दिसून येत आहे. चालू आठवड्यातील तिसऱ्या सत्रात बुधवारी बँकिंग व एफएमसीजी क्षेत्रातील मजबूत खरेदीमुळे सेन्सेक्सची झेप ही तब्बल 80,000च्या समीप पोहोचत नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. तर निफ्टीच्या कामगिरीतही भरारीची स्थिती राहिली […]