सेन्सेक्सने प्रथमच 81 हजारांचा टप्पा ओलांडला
आयटीचे समभाग नव्या उंचीवर : सलग चौथ्या सत्रात तेजीचा प्रवास कायम
वृत्तसंस्था /मुंबई
चालू आठवड्यातील गुरुवारी व सलग चौथ्या सत्रात भारतीय भांडवली बाजारात तेजीचा प्रवास कायम राहिल्याचे दिसून आले. यामध्ये गुरुवारी बाजारात सुरुवातीच्या घसरणीतून सावरत बाजाराने तेजी पकडली. विविध कंपन्यांपैकी आयटी क्षेत्रातील समभागांच्या कामगिरीमुळे बीएसई सेन्सेक्सने प्रथमच तब्बल 81 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. दुसऱ्या बाजूला निफ्टीनेही 24,800 ची पातळी गाठली आहे.
मुख्य कंपन्यांच्या सकारात्मक कामगिरीमुळे भारतीय बाजारात गुरुवारी दिवसअखेर सेन्सेक्स 626.91 अंकांच्या भक्कम स्थितीसह निर्देशांक 81,343.46 वर नवा विक्रम नेंदवत बंद झाला आहे. दिवसभरात सेन्सेक्स 80,390.37 ते 81,522.55 च्या दरम्यान कार्यरत राहिला होता. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 187.85 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 24,800.85 वर बंद झाला आहे.
सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 22 समभाग हे वधारुन बंद झाले आहेत. यामध्ये टीसीएस, बजाज फिनसर्व्ह, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, इन्फोसिस आणि टेक महिंद्रा यांचे समभाग पहिल्या पाचमध्ये तेजीत राहिले. यासह हिंदुस्थान युनिलिव्हर, स्टेट बँक, एचसीएल टेक, कोटक बँक, भारती एअरटेल, टायटन, सनफार्मा, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स, लार्सन अॅण्ड टुब्रो, टाटा मोर्ट्स, नेस्ले इंडिया, अॅक्सिस बँक, इंडसइंड बँक आणि मारुती सुझुकी यांचे समभाग नफा कमाईत राहिले आहेत.
अन्य कंपन्यांमध्ये 30 मधील 8 समभाग हे प्रभावीत राहिले आहेत. यात एशियन पेन्ट्स, जेएसडब्ल्यू स्टील, एनटीपीसी, अदानी पोर्ट्स आणि टाटा स्टील यांचे समभाग सर्वाधिक नुकसानीत राहिले. तर पॉवरग्रिड कॉर्प, एचडीएफसी बँक आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग हे मात्र घसरणीसह बंद झाले. विविध घडामोडींचा मागोवा घेतल्यास यामध्ये गुरुवारी आयटीच्या समभागांनी नवी उंची प्राप्त केली आहे. तसेच रुपया कमकुवत आणि जून तिमाहीमधील देशातील मुख्य आयटी कंपन्यांची सकारात्मक कामगिरी यामुळे बाजाराला बळ मिळाल्याचे दिसून आले. या सकारात्मक स्थितीमुळे बाजारात गुंतवणूकादारांचा आत्मविश्वास वाढला आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
एलटीआय माइंट्री 5756
टीसीएस 4315
ओएनजीसी 331
बजाज फिनसर्व्ह 1651
विप्रो 573
एसबीआय लाइफ 1659
महिंद्रा आणि महिंद्रा 2819
श्रीराम फायनान्स 2867
एचयुएल 2738
इन्फोसिस 1758
एचसीएल टेक 1594
टेक महिंद्रा 1539
एसबीआय 893
टाटा कन्झु. 1193
कोटक महिंद्रा 1826
भारती एअरटेल 1483
अपोलो हॉस्पिटल 6520
आयटीसी 470
सनफार्मा 1594
टायटन 3262
इंडसइंड बँक 1456
नेस्ले 2627
बजाज फायनान्स 7110
बीपीसीएल 318
रिलायन्स 3173
लार्सन टुब्रो 3656
आयशर मोटर्स 4941
अॅक्सिस बँक 1309
एचडीएफसी लाइफ 648
टाटा मोटर्स 1024
डॉ. रेड्डीज लॅब्ज 6667
डिव्हीस लॅब्ज 4584
ब्रिटानिया 5871
मारुती सुझुकी 12644
समभाग घसरलेल्या कंपन्या
एशियन पेंटस् 2931
कोल इंडिया 505
हिरो मोटोकॉर्प 5502
ग्रासिम 2791
बजाज ऑटो 9626
एनटीपीसी 377
अदानी एंटरप्रायझेस 3092
