वरिष्ठ IAS अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीची आत्महत्या
उच्च आणि तंत्र शिक्षणाचे सचिव तसेच वरिष्ठ आयएएस अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीने मंत्रालयासमोरच्या इमारतीवरुन उढी मारून आत्महत्या केली आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप समजलेलं नाही. सुनीती इमारतीवरुन उडी मारून विकास रस्तोगी यांची कन्या लिपी रस्तोगी यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी मारल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रस्तोगी हे 1995 च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत.विकास रस्तोगी आणि राधिका रस्तोगी यांची कन्या असलेल्या लिपी रस्तोगीने आत्महत्या केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लिपीच्या खोलीमधून तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठीही मिळाली आहे. लिपी 27 वर्षांची होती. लिपीची आई राधिका या मुद्रा विभागामध्ये सचिव म्हणून कार्यरत आहेत.आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास लिपीने इमारतीच्या 10 व्या मजल्यावरुन उडी मारुन स्वत:ला संपवलं, असं ‘नागपूर टाइम्स’ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. उंचवरुन उडी मारल्याने या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तिला जीटी रुग्णालयामध्ये तिचे पार्थिव ठेवण्यात आलं आहे. मुलीने एवढं टोकाचं पाऊल उचलल्याने संपूर्ण कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. आज दुपारच्या सुमारास मुंबईतील चंदनवाडी स्मशान भूमीवर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. हेही वाचामुंबई बॉम्बस्फोटातील दोषीची तुरुंगात हत्या
लहान मुलाची खरेदी-विक्री करणाऱ्या टोळीला अटक
Home महत्वाची बातमी वरिष्ठ IAS अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीची आत्महत्या
वरिष्ठ IAS अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीची आत्महत्या
उच्च आणि तंत्र शिक्षणाचे सचिव तसेच वरिष्ठ आयएएस अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीने मंत्रालयासमोरच्या इमारतीवरुन उढी मारून आत्महत्या केली आहे.
आत्महत्येमागील कारण अद्याप समजलेलं नाही. सुनीती इमारतीवरुन उडी मारून विकास रस्तोगी यांची कन्या लिपी रस्तोगी यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी मारल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रस्तोगी हे 1995 च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत.
विकास रस्तोगी आणि राधिका रस्तोगी यांची कन्या असलेल्या लिपी रस्तोगीने आत्महत्या केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लिपीच्या खोलीमधून तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठीही मिळाली आहे. लिपी 27 वर्षांची होती. लिपीची आई राधिका या मुद्रा विभागामध्ये सचिव म्हणून कार्यरत आहेत.
आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास लिपीने इमारतीच्या 10 व्या मजल्यावरुन उडी मारुन स्वत:ला संपवलं, असं ‘नागपूर टाइम्स’ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. उंचवरुन उडी मारल्याने या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तिला जीटी रुग्णालयामध्ये तिचे पार्थिव ठेवण्यात आलं आहे. मुलीने एवढं टोकाचं पाऊल उचलल्याने संपूर्ण कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. आज दुपारच्या सुमारास मुंबईतील चंदनवाडी स्मशान भूमीवर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. हेही वाचा
मुंबई बॉम्बस्फोटातील दोषीची तुरुंगात हत्यालहान मुलाची खरेदी-विक्री करणाऱ्या टोळीला अटक