सीबीआयकडून कॅन्टोन्मेंटचे बडे अधिकारी ‘रडार’वर

आठवडाभरापासून गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डमधील कर्मचारी भरतीत गैरव्यवहार झाल्याची तक्रार केल्यानंतर सीबीआयकडून चौकशीचे सत्र सुरू आहे. कॅन्टोन्मेंटचे बडे अधिकारी सीबीआयच्या रडारवर आहेत. मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या या चौकशीमध्ये अनेक मोठे खुलासे उघड झाले असून त्यांच्यावर कोणती कारवाई होणार? हे पहावे लागणार आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये 29 कर्मचाऱ्यांची भरती करून घेण्यात आली होती. या भरतीवेळी उमेदवारांकडून लाखो […]

सीबीआयकडून कॅन्टोन्मेंटचे बडे अधिकारी ‘रडार’वर

आठवडाभरापासून गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी
बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डमधील कर्मचारी भरतीत गैरव्यवहार झाल्याची तक्रार केल्यानंतर सीबीआयकडून चौकशीचे सत्र सुरू आहे. कॅन्टोन्मेंटचे बडे अधिकारी सीबीआयच्या रडारवर आहेत. मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या या चौकशीमध्ये अनेक मोठे खुलासे उघड झाले असून त्यांच्यावर कोणती कारवाई होणार? हे पहावे लागणार आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये 29 कर्मचाऱ्यांची भरती करून घेण्यात आली होती. या भरतीवेळी उमेदवारांकडून लाखो रुपये घेतले असल्याची तक्रार केंद्रीय तपास यंत्रणांकडे करण्यात आली. तक्रारीची दखल घेऊन सीबीआयच्या बेंगळूर येथील पथकाकडून गैरव्यवहार प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन संपूर्ण चौकशी करण्यात येत आहे.
सीबीआय पथक तळ ठोकून
मागील आठवडाभरापासून सीबीआयचे पथक बेळगावमध्ये ठाण मांडून आहे. कॅन्टोन्मेंट कार्यालयात जाऊन चौकशी न करता बाहेर बोलावून उमेदवारांकडून संपूर्ण माहिती घेतली जात आहे. भरती करतेवेळी देण्यात आलेली रक्कम नेमकी कोणाकडे दिली?, तसेच आलेल्या पैशांचा वापर पुढे कशा पद्धतीने झाला? याचा निवाडा सीबीआयकडून केला जात आहे. यामध्ये अधिकाऱ्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घरी सीबीआयचे पथक दाखल झाले होते. परंतु संबंधित अधिकारी घरी नसल्याचे सीबीआयच्या लक्षात आले. तसेच बरेच कर्मचारी चौकशीला सामोरे जाण्यास टाळाटाळ करीत होते. परंतु सीबीआय अधिकाऱ्यांनी खाक्या दाखवताच सविस्तर माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे या गैरव्यवहार प्रकरणात किती जणांवर कारवाई होणार?, तसेच कॅन्टोन्मेंटमधील गैरव्यवहारांचे मूळ कायमचे नष्ट होणार का? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.