तालुक्याच्या विकासासाठी निंबाळकर यांना लोकसभेत पाठवा : बिर्जे

खानापूर : खानापूरच्या उमेदवाराला कॉंग्रेसने खासदारकीची उमेदवारी दिली. याचे कौतुक तालुक्यात होत आहे. त्यामुळे उमेदवार अंजली निबाळकर यांना मणतुर्गा गावातून 100 टक्के मतदान करा. याचा फायदा केंद्रात काँग्रेस सरकार आले तर महिलाना वर्षाकाठी 1 लाख रुपये तरतूद होणार आहे. शिवाय राज्य सरकारचेही दोन हजार रुपये महिलाना मिळत आहेत. याशिवाय काँग्रेस राज्य सरकारच्या पाच गॅरंटी योजना […]

तालुक्याच्या विकासासाठी निंबाळकर यांना लोकसभेत पाठवा : बिर्जे

खानापूर : खानापूरच्या उमेदवाराला कॉंग्रेसने खासदारकीची उमेदवारी दिली. याचे कौतुक तालुक्यात होत आहे. त्यामुळे उमेदवार अंजली निबाळकर यांना मणतुर्गा गावातून 100 टक्के मतदान करा. याचा फायदा केंद्रात काँग्रेस सरकार आले तर महिलाना वर्षाकाठी 1 लाख रुपये तरतूद होणार आहे. शिवाय राज्य सरकारचेही दोन हजार रुपये महिलाना मिळत आहेत. याशिवाय काँग्रेस राज्य सरकारच्या पाच गॅरंटी योजना चालू आहेत. इतक्या सोयी असताना इतर पक्षाचा विचार न करता खानापूर तालुक्याचा उमेदवार खासदार होणार हे आपल्या तालुक्याचे भाग्य समजा, असे यशवंत बिर्जे म्हणाले. मणतुर्गा येथील प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी विनायक मुतगेकर म्हणाले की, भाजपचे खासदार हेगडे-कागेरी हे राज्याचे शिक्षण मंत्री असताना खानापूरच्या सरकारी कन्नड हायस्कूलमध्ये मराठी माध्यम हायस्कूलच्या परवानगीसाठी मी निवेदन दिले तर या निवेदनाला कचऱ्याची टोपली दाखवण्यात आली. त्यामुळे आजतागायत सरकारी मराठी माध्यमाचे हायस्कूल झाले नाही. त्याचा त्रास खानापूर शहरातील विद्यार्थ्यांना आजही भोगावा लागत आहे. यासाठीच अंजली निंबाळकराना निवडून खासदार करा, असे आवाहन केले. यावेळी अॅड. ईश्वर घाडी यांनी विचार व्यक्त केले. प्रारंभी ईश्वर बोबाटे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रचारसभेला महादेव घाडी, अनिता दंडगल, भारती पाटील, राजू पाटील उपस्थित होते. प्रचारसभेच्या अध्यक्षस्थानी वासुदेव पाटील होते. यावेळी विलास पाटील, जयवंत पाटील, महादेव पेडणेकर, निल्लापा कनसीनकोप, महादेव पाटील, मोहन पाटील, दशरथ देवकरी, सुरेश लोहार, अमृत बोबाटे, मोहन शेंदुळकर, तुकाराम पेडणेकर, महेश पाटील, राजाराम गुंडपीकर उपस्थित होते.